शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी मदतनीसाची नियमबाह्य नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 00:36 IST

एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात शहरातील अंगणवाडी मदतनिस या पदावर कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यास गेल्या दीड वर्षापासून चपराशी या पदावर...

बालविकास प्रकल्प कार्यालयभद्रावती : एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात शहरातील अंगणवाडी मदतनिस या पदावर कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यास गेल्या दीड वर्षापासून चपराशी या पदावर नियमबाह्यरित्या राबवून घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील अंगणवाडी मदतनीसपदावर कार्यरत शोभा सोनटक्के हिला तिच्या मनाविरूद्ध प्रकल्प अधिकारी बावणे यांनी कार्यालयात चपराशी म्हणून ठेवले आहे. तिला या कार्यालयाच्या झाडलोटीपासून पाणी व फायली देण्यापर्यंतचे काम घेण्यात येते. तर या कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी देवगडे अधिकाऱ्याच्या तोऱ्यात वावरत असतात. ते चपराशी काम करण्याकरिता कमीपणा मानत असल्याने महिलेच्या व्यतिरिक्त त्यांनी स्वत:चे पैसे देवून राहुल पेटकर या युवकास कार्यालयात कामावर ठेवले आहे. पेटकर हा तालुक्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांच्याकडून कार्यालयात आल्यानंतर कामाचे पैसे घेतात. त्यास अधिकाऱ्यांची मूक संमती आहे. (शहर प्रतिनिधी)मदतनीस बंगाली कॅम्प आंगणवाडीत कार्यरत आहे. कार्यालयातील कामकाज करण्याकरिता कर्मचाऱ्याची कमतरता असल्याने तिला गेल्या दीड वर्षापासून ठेवले आहे. आता मी तिला उद्यापासून त्या अंगणवाडीत कामास पाठवितो.- बावणे, प्रभारी प्रकल्प अधिकारीहा प्रकार दुर्दैवी असून एका महिलेस नियमाविरूद्ध त्याच्याकडून काम घेणे योग्य नाही. याकडे जर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तिला पूर्वपदावर नियुक्त न केल्यास आंदोलन करण्यात येईल.-वनिता घुमे, समाजसेविका