शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस प्रमाणपत्राच्या आधारे होतेय बांधकाम मजुरांची नोंदणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:25 IST

चौकशी करण्याची मागणी : दलालांकडून लाभार्थ्यांची आर्थिक लूट

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : बांधकाम कामगार मजुरांना कामगार असल्याचे प्रमाणपत्र मिळाले तर योजनेचा लाभ दिला जातो. यात आर्थिक लाभाच्या योजना असल्याने अनेक उचभ्रू परिवारातील महिला, पुरुष व तरुणांनी एकही दिवस कामावर गेले नसताना दलालामार्फत अधिकचे पैसे देऊन बांधकाम मजुराचे बोगस प्रमाणपत्र मिळवीत आहेत. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बांधकाम मजुराची नोंदणी केली जात आहे.

नोंदणीच्या आधारे अनेक आर्थिक लाभाच्या योजना उचलत असून शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. परिणामी पात्र बांधकाम कामगार लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. 

सामाजिक सुरक्षा, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य यासह अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळवून देणे, कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे, रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे हा महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश आहे. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये एखाद्या कंत्राटदारांकडे किंवा कामाच्या इतर ठिकाणी वर्षभरात कमीत कमी ९० दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र व ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

मात्र, सद्यःस्थितीत ग्रामपंचायतीच्या सचिवांकडून प्रमाणपत्र देणे बंद आहे. अशा स्थितीत एकही दिवस कामावर न गेलेले उचभ्रू परिवारातील लोकांनी आर्थिक लाभाच्या योजनेसाठी दलालामार्फत बनावट प्रमाणपत्र जोडून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली व अनेक योजनांचा लाभ घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील वर्षभरात नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी जोडलेल्या कागदपत्रांची जिल्हास्तरावरून चौकशी केल्यास अनेक बोगस बांधकाम कामगार मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

कामावर नसतानाही देतात प्रमाणपत्र कंत्राटदारकडे कामगार एकही दिवस बांधकामावर नसतानाही अनेक कंत्राटदारांनी आर्थिक लोभापायी बांधकाम कामगाराच्या फॉर्मवर स्वाक्षरी दिलेल्या आहेत. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या फॉर्मची तपासणी करून स्वाक्षरी असलेल्या कंत्राटदाराच्या कामावरील मस्टरची चौकशी केल्यास अनेक कंत्राटदारसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर