शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे सचिव जिवती येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:50 IST

मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी यांनी आज रविवारी जिवती तालुक्यात दाखल होत विकासकामांबाबत विविध विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : विकासकामातील अडचणी जाणून घेतल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी यांनी आज रविवारी जिवती तालुक्यात दाखल होत विकासकामांबाबत विविध विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली.जिवती तालुक्याच्या विकासकामात अडथळे येत असल्याने आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मुंख्यमंत्री यांच्या आदेशानुसार ३ आॅगस्ट रोजी बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पाऊल उचलत आपले सचिव प्रविण परदेशी यांना जिवती येथे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने रविवारी प्रविण परदेशी यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व वनविभागाचे उपवनसंरक्षक आणि आ. अ‍ॅड. संजय धोटे यांच्यासह जिवती येथे दौरा करून विकासकामात येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील महसूल व वनविभागाशी महत्वपूर्ण चर्चा केली.बंद पडलेल्या तलावासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर पूर्वीपासून वनेत्तर वापरात असलेले ३३,१२८.८३ हेक्टर क्षेत्राच्या निर्वनीकरणाचा प्रस्ताव झुडपी जंगल प्रस्तावाप्रमाणे सुलभ कार्यपद्धतीद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी परदेशी यांनी नविन जंगलतोड करण्यावर आळा घालण्याचा सल्ला दिला. सध्या ताबा असलेल्या जमिनीतील उत्पादन कसे वाढविता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आली. निर्वनीकरणाचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्याचे आदेश परदेशी यांनी दिले. याप्रसंगी वनविभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.