शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:37 IST

रुग्णालयातील कारभारामुळे रुग्ण त्रस्त झाले आहे. त्यामुळे लोकमतने ९ सप्टेंबरपासून रुग्णालयातील असुविधांबाबत वृत्तमालिका चालवून शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देरूग्णालयाचा आढवा : प्रत्येक ठिकाणी यंत्रणा सक्षम ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रुग्णालयातील कारभारामुळे रुग्ण त्रस्त झाले आहे. त्यामुळे लोकमतने ९ सप्टेंबरपासून रुग्णालयातील असुविधांबाबत वृत्तमालिका चालवून शासनाचे लक्ष वेधले. या वृत्तमालिकेमुळे जिल्हाभरातील आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकमतच्या बातम्यांवरून काँग्रेसनेही आवाज उठविला. आता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनीही याची गंभीर दखल घेतली असून बुधवारी आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकाºयांना आपल्या कक्षात बोलावून रुग्णालयातील कारभाराचा आढावा घेतला. गोरगरिब रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटीबध्द असून या यंत्रणेवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार आहे, असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर येथील सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापनाचे सूत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेले आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. एम. जे. खान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. श्रीरामे, डॉ. प्रिती प्रियदर्शनी, डॉ. बेंबे आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाºयांनी सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागातील कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी गेल्या पाच वर्षातील प्रसूती व नवजात बालकांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी जाणून घेतली. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यापासून गडचिरोली, यवतमाळ जिल्हयातून मोठया प्रमाणात रुग्ण येत आहे. त्यामुळे प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य यंत्रणेने प्रत्येक टप्प्यावर अ‍ॅलर्ट असावे, अशी तंबी जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिली. जिल्हा शल्य चिकित्सकांनीही आपल्या स्तरावरील यंत्रणा बळकट करण्याबाबतचे निर्देश वेळोवेळी संबंधितांना द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिल्या.बालमृत्यूबाबत बोलताना बालरोग तज्ज्ञ डॉ. एम. जे. खान यांनी या ठिकाणी मोठया संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने बालमृत्यूची आकडेवारी अधिक वाटत असल्याचे जिल्हाधिकाºयांसमोर स्पष्ट केले. जिल्हयातील दुर्गम भागातील रुग्णांना येथे पोहचेपर्यंत उशीर होतो. त्यामुळे प्रसुती संदर्भातील रुग्णांची अधिक काळजी स्थानिक पातळीवरच घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाºयांना सांगून आपल्या कोर्टातील चेंडू इतरत्र ढकलला. यावेळी बालमृत्यू कशामुळे होत आहे. त्याची कारणे कोणती आहेत, याची चर्चाही जिल्हाधिकाºयांनी केली.सामान्य रुग्णालयात बेडवरच महिलेची प्रसुतीचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सातत्याने बालमृत्यू होत असताना व्यवस्थापन किती गंभीर आहे. याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा आला. वेळीच उपचार न मिळाल्याने एका महिलेने चक्क बेडवरच आपल्या बाळाला जन्म दिल्याची घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत माहिती घेतली असता असे प्र्रकार येथे नवीन नसल्याचे सूत्राने सांगितले. मंगळवारी एक महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात भरती झाली. ती वॉर्ड क्र.९ मधील बेड क्र. ३ येथे होती. महिलेला आज प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतरही तिची दखल कुणीही घेतली नाही. अखेर त्या महिलेने त्याच बेडवर एका बाळाला जन्म दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाल्याचेही सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.