शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बोजा चढवून देण्यास तलाठ्याचा नकार

By admin | Updated: April 9, 2015 01:16 IST

बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती.

नागभीड : बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. पण येथील काही युवकांनी तहसिलदार श्रीराम मुंदडा यांच्याकडे तक्रार करताच तलाठी सरळ झाला.ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न आहे, अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला २५ हजाराचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बाम्हणी येथील भाऊराव भुळे या शेतकऱ्याने या योजनेसाठी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अर्ज केला. बँकेने तो मंजुरीही केला अािण तलाठ्यांकडून जमीनीवर बोजा चढवून आणा, अशी भुळे यांना सूचना दिल्या.बँकेच्या सूचनेनुसार भुळे तलाठ्याकडे गेले. पण तलाठी भुळे यांना दाद देईना. अपाल्या पातळीवर भुळे यांनी विविध प्रयत्न केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी भुळे यांनी मोहाळीचे माजी सरपंच अमित देशमुख आणि युवा कार्यकर्ते समिर भोयर यांच्याकडे धाव घेतली. देशमुख आणि भोयर यांनी भुळे यांना सोबत घेवून तहसिलदार श्रीराम मुंदडा यांची भेट घेतली व त्यांना झालेला प्रकार सांगितला. तहसिलदार मुंदडा यांनी या प्रकाराबद्दल तलाठ्याला विचारणा केली व सदर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून देण्याच्या सुचना केल्या. (तालुका प्रतिनिधी)