शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

रात्रीचे अपघात टाळण्यासाठी अनेक सायकलींना लावले रिफ्लेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने सायकल चालकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. बंगाली कॅम्प व श्री टॉकीज चौक येथे या मोहिमेचा शभारंभ सकाळी ८ वाजता करण्यात आला. स्थानिक बंगाली कॅम्प चौकात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देचंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा पुढाकार : वाढते अपघात चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परिवहन विभागाशी संबंधित कार्यालये व इतरांकडून रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान वाहनचालकांना वाहतूक शिस्त आणि नियमांबाबत मार्गदर्शन केले जाते. मात्र चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने एक पाऊल पुढे टाकत शेकडोच्या संख्येने असलेल्या कामगार व इतर सायकल स्वारांसाठी चंद्रपुरात रिफ्लेक्टर मोहीम राबविली. महाराष्ट्रातील कदाचित पहिलाच उपक्रम या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने सायकल चालकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. बंगाली कॅम्प व श्री टॉकीज चौक येथे या मोहिमेचा शभारंभ सकाळी ८ वाजता करण्यात आला. स्थानिक बंगाली कॅम्प चौकात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी शेकडो सायकलींना रिफ्लेक्टर लावून रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे रात्रीच्या अंधारात रेडियमवर प्रकाश पडल्यानंतर सायकल दिसून येते. त्यामुळे सायकल चालकांसाठी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मदत होणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी सीबीएसएसच्या उपक्रमाचे कौतुक करीत केंद्रीय स्तरावर पोहचविणार असल्याची ग्वाही दिली. सायकल चालकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. फासे यांनी व्यक्त केले.चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या या उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा उपक्रम सुरू होणार असल्याचेही पाहुण्यांनी यावेळी सांगितले. मोहिमेची जबाबदारी सुबोध कासुलकर, वनश्री मेश्राम यांनी जबाबदारी पार पाडली. यशस्वीतेसाठी विजय चंदावार, डॉ. भास्करवार, डॉ. दास, मधुसूदन रूंगठा, अश्विनी खोब्रागडे, दिनेश जुमडे, शिशिर हलदार, सागर येळणे, आशिष रॉय, स्वप्नील राजुरकर, कपिश उसगावकर, डॉ. पालीवाल, कावळे, महेंद्र राळे, रायपुरे, गुंडावार, उपगन्लावार, जुगल सोमानी, अमोल राऊत, राहुल ताकवट आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर