शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘रेफर टू नागपूर’ पेशंटची अँम्ब्युलन्स पोहोचली चंद्रपूरच्या मल्टी स्पेशालिटीत

By admin | Updated: August 12, 2014 23:40 IST

गंभीर रूग्णांवर कसलाही उपचार न करण्याची जोखीम न बाळगता ‘रेफर टू नागपूर’ असा शेरा देऊन नागपूरकडे बोळवण करण्याचा प्रकार चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाला नवा नाही.

चंद्रपूर : गंभीर रूग्णांवर कसलाही उपचार न करण्याची जोखीम न बाळगता ‘रेफर टू नागपूर’ असा शेरा देऊन नागपूरकडे बोळवण करण्याचा प्रकार चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाला नवा नाही. मात्र नागपूरला रेफर केलेला रूग्ण चक्क चंद्रपुरातील एका मल्टी स्पेशालिटीत पोहोचविण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मात्र रूग्णाची आर्थिक स्थिती तेथील खर्च झेपण्याएवढी नसल्याने तब्बल तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा या रूग्णाचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजकडे प्रवास सुरू झाला. प्रीती प्रशांत मांडवकर असे या रूग्णाचे नाव असून मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती गंभीर अवस्थेत नातेवाईकांसह येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी आली होती. मात्र तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये भरती होण्याचा सल्ला देण्यात आला. रूग्णालयाच्या सेवेत असलेल्या चारही रूग्णवाहिका बाहेर असल्याने १०८ टोल फ्री वरून रूग्णवाहिका पाचारण करण्यात आली. डॉक्टरांनी रूग्णवाहिकेत सेवेवर असलेल्या डॉ.कोरडे यांना रूग्णाचे डिस्चार्ज कार्ड देऊन नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या. ही रूग्णवाहिका रूग्णालयातून निघाली. मात्र नागपूरकडे न जाता जनता कॉलेजजवळील वासाडे मल्टीस्पेशालिटीत पोहोचली. तिथे रूग्णाच्या नातेवाकाईकांना कसलीही पूर्वसूचना न देता अथवा त्यांच्याशी चर्चा न करता रूग्णाला उतरविण्यात आले. येथील डॉक्टर आधी उपचार करतील, त्यानंतर नागपूरला जायचे किंवा काय हे ठरवितील, असे सांगण्यात आले. भांबावलेले रूग्णाचे नातेवाई रूग्णाला डॉक्टरकडे नेत असतानाच ही अ‍ॅम्ब्युलन्स तिथून निघूनही गेली. तेथील डॉक्टरांनी २० ते २५ हजार रूपयांचा खर्च येईल, असे सांगितल्याने त्यांचे त्राणच गळाले. अखेर नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यावर पलिकडून पुन्हा जिल्हा सामान्य रूग्णालयात परत या, असे सांगण्यात आले. अखेर अशा बिकट परिस्थितीत रूग्णांच्या नातेवाईकांनी आॅटोने रूग्णाला सामान्य रूग्णालयात परत आणले. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा १०८ वर संपर्क साधून त्याच रूग्णवाहिकेने या रूग्णाला नागपूरला रवाना केले. प्रत्यक्षात पहिल्यांदा दुपारी ४ वाजता नागपूरला निघालेला हा पेशंट सायंकाळी ६.३० पर्यंत नागपुरात पोहोचला असता. मात्र निव्वळ रूग्णवाहिकेतील डॉक्टरच्या चुकीमुळे नागपूरचा प्रवास दुसऱ्यांदा सायंकाळी पावणेसहा वाजता सुरू झाला. या काळात रूग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना ज्या मनस्थितीतून जावे लागले, ते मात्र शब्दांच्या पलिकडचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)