शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यात पशुधनात होत आहे घट

By admin | Updated: January 17, 2015 22:56 IST

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे.

सिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. यासाठी जनावरांच्या चारा पाण्याची भेडसावणारी समस्या कारणीभूत ठरत आहे.शेतकरी व शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहेत. देशातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलाचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणून बैलांची ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत, तर दुसरीकडे शेतमजुरांच्या मजुरीत पाच पटीने वाढ झाली आहे. परिणामी शेती करणे धान उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारे नाही. बैलाची, गाय व म्हैस यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलाचा गोठा असे. त्या गोठ्यात बैल दिसणे हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बैलाचे गोठे दिसेनासे झाले आहेत. पूर्वी जंगलात जनावरांसाठी कुरण राखून ठेवायचे, आता कुरणेही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळणारे दुध, दही, लोणी, तूप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते. त्यावेळी ग्रामीण भागात दुधाची धवलक्रांती होती. लग्न कार्यप्रसंगी लागणारे दुध, दही गावातच मिळत होते. सोबत शेणखत तयार होत होते. शेतातील पिकाचे उत्पादनात वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चारा पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी व शेतमजुरांनी गेल्या दहा वर्षात पाळीव जनावरे विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ जनावरे सुद्धा दुसऱ्यालाच विकावी लागतात. काही जनावरे कत्तलखान्यात विकतात. त्यामुळे ग्रामीण भागात व शहरात गाय व म्हशीचे दूध मिळत नाही. त्यामुळे आता प्लॉस्टिकमधील दूध विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)