शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रेतीअभावी वेकोलिच्या भूमिगत खाणीतील उत्पन्नात घट

By admin | Updated: May 11, 2014 00:14 IST

माजरी भूमिगत कोळसा खदानीत कोळसा खाढल्यानंतर त्या जागी भरण्याकरिता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरू शकत नसल्याने भूमिगत कोळसा खदानीतील

ंवरोरा : माजरी भूमिगत कोळसा खदानीत कोळसा खाढल्यानंतर त्या जागी भरण्याकरिता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरू शकत नसल्याने भूमिगत कोळसा खदानीतील प्रति दिवस ११०० टन उत्पादन देणार्‍या खदानीला मागील पाच महिन्यांपासून प्रतिदिन ३०० टन कोळसा उत्पादन होत आहे. त्यामुळे स्थायी कामगारांमध्ये असुरक्षिततचे वातावरण पसरले असून रेतीअभावी भूमिगत कोळसा खदानीत आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भूमिगत कोळसा खदानीत कोळसा काढल्यानंतर पाणीमिश्रीत रेती भरण्यात येते. त्यानंतर पुढील कोळसा काढला जातो. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता कमी असल्याने भूमिगत कोळसा खदानीत कामगारही सुरक्षीत राहते. रेतीचा भरणा केला. नाही तर मोठा अपघातही होण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसात रेती अभावी आग लागण्याची मोठी शक्यता असते. भूमिगत कोळसा खदानीत उत्पादनाच्या १.८ टक्के रेतीचा भरणा करणे आवश्यक असते. भूमिगत कोळसा खदानीत १०३९ स्थायी कामगार कार्यरत आहे. मागील दोन वर्षांपासून पाच हेक्टर आराजी असलेल्या घाटातील रेती काढण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागते. वेकोलिच्या वतीने पर्यावरण विभागाकडे रेतीच्या मंजुरीकरिता प्रकरण पाठविण्यात आले आहे. याकरिता पर्यावरण विभागाची एक चमू येऊन निरीक्षण करून गेली परंतू अद्यापही मंजुरी मिळाली नाही. सध्या कोळसा काढलेल्या ठिकाणी मिश्रीत माती भरण्यात येत आहे. ११०० टन प्रति दिन उत्पादन करणार्‍या या भूमिगत खदानीचे उत्पादन सध्या दिवसाकाठी ३०० टनावर घसरले आहे. उन्हाळ्यामध्ये रेती अभावी खदानीत आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट आल्याने कामगारांमध्ये भिती व्यक्त केल्या जात आहे. उत्पादनात घट आल्याने कामगारांचे स्थानांतरण इतरत्र केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अनेक कामगार वणी, वरोरा, माजरी परिसरात स्थायी झाले आहे. त्यांचे स्थानांतरण झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनाही झळ सोसावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. रेतीकरिता १ कोटी ६० लाख शासनास देणे आहे. त्यातील ४४ लाखाचा भरणा केला. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. उत्पादनात घट झाल्याने कामगारांना अतिरिक्त सुविधा देता येत नाही. एक महिन्यात रेती मिळणे आवश्यक आहे. मागील काही महिन्यापासून रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव प्रकाशीत न करण्याच्या अटीवर दिली. (तालुका प्रतिनिधी)