शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लाल नाला मुख्य कालव्यातून मोखाळा उपकालवा काढणार

By admin | Updated: August 29, 2015 01:23 IST

तालुक्यातील मोखाळा गावापासून सोईट गावापर्यंत लाल नाला प्रकल्पातील मुख्य कालवा काढण्यात आला आहे.

वरोरा : तालुक्यातील मोखाळा गावापासून सोईट गावापर्यंत लाल नाला प्रकल्पातील मुख्य कालवा काढण्यात आला आहे. या मुख्य कालव्यातून मोखाळा गावापासून उपकालवा काढण्यात यावा, याकरिता आमदार बाळू धानोरकर यांनी जलसंपदा तथा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना भेटून चर्चा करीत निवेदन दिले.वरोरा तालुक्यातील लाल नाला प्रकल्पातील मुख्य कालवा मोखाळा गावापासून सोईट गावापर्यंत गेला आहे. परंतु मोखाळा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळत नाही. त्यामुळे मोखाळा गाव परिसरातील शेतकरी सिंचनापासून मागील कित्येक वर्षापासून वंचित राहात आहे. लाल नाला मुख्य कालव्यातून उपकालवा मोखाळा येथून काढल्यास मोखाळा, आल्फर, साखरा, लोधीखेडा व पोहे या गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरिता उपयुक्त होईल व ३०० हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. याकरिता लाल नाला मुख्य कालव्यातून मोखाळा उपकालवा काढावा, यासाठी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत आमदार बाळू धानोरकर यांनी चर्चा केली.राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मोखाळा उपकालव्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिल्याने येत्या काही महिन्यात मोखाळा उपकालव्याच्या कामास प्रारंभ होणार आहे.शिवतारे यांना निवेदन देताना चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे, शहर प्रमुख सुरेश पचारे, सतनाम सिंग सोखी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)