शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

चंद्रपुरातील उत्तर प्रदेश बलिया येथून परत आलेला महाकाली कॉलनी येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. ऊर्जानगर येथील ४० वर्षीय महिला, हवेली गार्डन येथील नागपुरवरून परत आलेला युवक बाधित ठरला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपकार्तून लालपेठ कॉलनी येथील हेल्थ क्लबजवळील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. श्वेता रेसिडेंट येथील पुरुष बाधित ठरला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील रुग्णसंख्या झाली ८३३ । नवे ५६ बाधित वाढले, चंद्रपूरात तिसरा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शनिवारी पुन्हा कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५६ बाधितांची वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८३३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४६६ कोरोना बाधितांना उपचाराअंती सुटी देण्यात आली आहे. तर सध्या ३६४ बाधितांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, दुर्गापृर येथील ६७ वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. हा बाधित सारीचा रुग्ण होता. जिल्ह्यात आतापर्यंत तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे.शनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर येथील २७ बाधित , बल्लारपूर तालुक्यातील २२, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील एका बाधितांचा समावेश आहे.चंद्रपुरातील उत्तर प्रदेश बलिया येथून परत आलेला महाकाली कॉलनी येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. ऊर्जानगर येथील ४० वर्षीय महिला, हवेली गार्डन येथील नागपुरवरून परत आलेला युवक बाधित ठरला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपकार्तून लालपेठ कॉलनी येथील हेल्थ क्लबजवळील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. श्वेता रेसिडेंट येथील पुरुष बाधित ठरला आहे. यासोबतच तुकुम, पोलीस कॉलनी, इंदिरा नगर दुर्गा चौक, बंगाली कॅम्प येथेही बाधित निघाले आहेत. रामनगर कॉलनी, रामाळा तलाव, मेजर गेट, पठाणपुरा, कुंदन प्लाझा, जटपुरा गेट, बालाजी वॉर्ड गोपाल पुरी, सवारी बंगला पठाणपुरा, श्याम नगर, जीएमआर वरोरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर व मूल येथेही बाधित आढळले आहेत.आतापर्यंत ११२०८ अ‍ॅन्टिजेन तपासण्या पूर्णजिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार २०८ नागरिकांची अ‍ॅन्टिजेन तपासणी केलेली आहे. यापैकी १०० पॉझिटिव्ह आले असून ११ हजार १०८ जण निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९१ हजार ५६२ नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये एक हजार २१७ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर एक हजार ६२० नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.१९ ते ४० वयोगटातील ४८२ बाधितजिल्ह्यातील बाधितांची संख्या ८१६ वर पोहोचली आहे. यापैकी ० ते ५ वर्षे वयोगटातील १५ बाधित, ६ ते १८ वर्ष वयोगटातील ५६ बाधित, १९ ते ४० वर्षे वयोगटातील सर्वाधिक ४८२ बाधित, ४१ ते ६० वर्षे वयोगटातील १९१ बाधित तर ६१ वर्षावरील ३३ बाधित आहेत.जिल्ह्याबाहेरील ४२ बाधितशुक्रवारपर्यंत केवळ जिल्ह्यातील बाधित रुग्ण ६८१ आहेत. जिल्ह्याबाहेरील ४२ बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या ५४ आहे.जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनजिल्ह्यात सध्या ७६ कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर ८५ कंटेनमेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ८५ कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. ३४१ आरोग्य पथकाद्वारे १५ हजार १८७ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या