शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशपत्रासाठी ५० रूपयांची वसुली

By admin | Updated: March 2, 2016 00:17 IST

इयत्ता दहावी बोर्डाच्या पेपरला प्रवेश घेण्याकरिता प्रती विद्यार्थी ५० रुपयाची अवैध वसुली केल्याचा प्रकार बल्लारपूर

येनबोडीतील प्रकार : परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची लूटकोठारी : इयत्ता दहावी बोर्डाच्या पेपरला प्रवेश घेण्याकरिता प्रती विद्यार्थी ५० रुपयाची अवैध वसुली केल्याचा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयात उघडकीस आला. या प्रकाराने गोरगरीब ग्रामीण शेतकरी, शेतमजूर पालकांत संताप पसरला आहे. परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्राची गरज असते. मात्र त्यासाठी फीची किंवा दंडाची किंवा अवैध वसुली करण्याचे अधिकार नाहीत. तरीही शाळेची दुरुस्ती व पाहुण्याचे आवभगत करण्यासाठी तसेच परिक्षेच्या वेळी तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाची तजबीज करण्यासाठी प्रती विद्यार्थी ५० रुपयाची वसुली करण्यात आली. ही वसुली दरवर्षीच केल्या जाते. उलट त्यात यावर्षी २० रुपयाची वाढ केल्याचे शाळेतील शिक्षकांनी छातीठोकपणे सांगितले. परीक्षा प्रवेश पत्रासाठी शाळेने प्रती विद्यार्थ्यांकडून केलेली ५० रुपयाची वसुली अवैद्य असून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. यात ३०० विद्यार्थ्यांकडून १५ हजाराची वसुली केल्याचे समजते. घेतलेले पैसे शाळेने त्वरित परत करण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे. (वार्ताहर)