शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसांत दीड लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:46 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईने वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर सुरु केला आहे.

ठळक मुद्देवाहतूक शाखेची कारवाई : २७२ दुचाकीस्वार आढळले हेल्मेटविना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईने वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर सुरु केला आहे.चंद्रपुरात एकाच आठवड्यात घडलेल्या दोन अपघाताच्या घटनेत एक शिक्षिका व एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दखल घेत जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले.त्यानुसार वाहतूक विभागाने शहरातील विविध चौकामध्ये तसेच मुख्य मार्गावर वाहतूक शिपायांची नियुक्ती करुन विना हेल्मेटने गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे सुरु केले असून प्रत्येक वाहनचालकांंना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.त्यानुसार मागील पाच दिवसात वाहतूक विभागाने २७२ वाहनचालकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात वाहतूक निरिक्षक विलास चव्हाण व त्यांच्या चमूने केली.हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांचा सत्कारहेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्याच्या दृष्टीने वाहतूक विभागाने हेल्मेट घालून प्रवास करणाºया वाहनधारकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच आपल्या आप्तेष्ठांना हेल्मेट घालण्याबाबात प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले.सक्ती नकोय, रस्त्याची दुरुस्ती कराशहरातील रस्त्यावरील खड्ड्याने एका शिक्षिकेचा व एका १७ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरातील रस्त्याचा व वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्ती लागू केली. त्यानुसार विना हेल्मेट वाहनचालविणाºयांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातात जीव जात असताना त्यावर आळा घालण्यासाठी हेल्मेट सक्ती हा पर्याय नसून रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सुरु शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.कारवाईपोटी ‘टप्पर’ हेल्मेटचा वापरजिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी १४ जुलैला हेल्मटसक्ती लागू केली. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेटने गाडी चालवणाऱ्यांना वाहनधारकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले शंभर ते दोनशे रुपये किंमतीचे टप्पर हेल्मेटचा वापर करताना दिसून येत आहेत.अपघात वेळी-अवेळी होऊ शकतात. त्यामुळे नेहमी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत. ही घटना टाळण्यासाठी वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा.- विलास चव्हाण,वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर