शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर वीज केंद्रातून विक्रमी वीज उत्पादन

By admin | Updated: May 27, 2017 00:34 IST

२६ मे रोजी येथील वीज केंद्राच्या सात संचातून २४५२ मेगावाट वीज उत्पादनाचा नवीन उच्चांक गाठला.

महानिर्मितीची माहिती : २४५२ मेगावॅटचे उत्पादन, संपानंतरही वीज उत्पादन सुरळीतलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २६ मे रोजी येथील वीज केंद्राच्या सात संचातून २४५२ मेगावाट वीज उत्पादनाचा नवीन उच्चांक गाठला. लवकरच या संचातून २७०० मेगावाट इतक्या वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठण्याचे नियोजन असल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी दिली आहे.महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज केंद्राची स्थापित क्षमता २९२० मेगावाट इतकी असून येथे प्रत्येकी २१० मेगावाट क्षमतेचे दोन संच क्रमांक ३ व ४ तसेच ५०० मेगावॉट क्षमतेचे पाच संच क्रमांक ५,६,७,८,९ संच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, मागील सहा दिवसांपासून राज्यभरातील विविध विद्युत केंद्रात कंत्राटी कामगारांचा संप सुरु आहे. मात्र, महानिर्मितीचे अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटदार व काही कंत्राटी कामगारांनी घेतलेल्या सांघिक परिश्रमातून महानिर्मितीच्या औष्णिक, जल, वायू व सौर वीज केंद्रांतून दररोज सुमारे ७००० मेगावाट इतके अखंडित वीज उत्पादन ठेवणे शक्य झाले आहे. यातून राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रखर उन्हाळा, विजेची वाढती मागणी आणि कंत्राटी कामगारांचा संप अशा पार्श्वभूमीवर आगामी काळात, मागणीनुसार वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठण्याचे नियोजन महानिर्मितीकडून करण्यात आले आहे. राज्यभरात चार संच बंदमागील काही दिवसांत विदर्भात ४७ अंश पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून सर्वदूर प्रखर उन्हाळा असल्याने विविध विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. पयार्याने राज्यात विजेची मागणी सातत्याने वाढतच आहे. राज्यभरातील महानिर्मितीच्या २७ संचांपैकी २३ संचांतून वीज उत्पादन सुरु असून ४ संच तांत्रिक कारणांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. लवकरच या संचांतून देखील वीज उत्पादन घेण्यात येणार आहे. कामगारांच्या संपाचा परिणाम नाही वीज केंद्रातील कंत्राटी कामगरांचा संप सुरू असून महानिर्मितीच्या भुसावळ वीज केंद्रातील कंत्राटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. चंद्रपूर व खापरखेडा वीज केंद्र वगळता महानिर्मितीच्या इतर वीज केंद्रात संपाचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. एकूणच, कंत्राटी कामगारांच्या संपामुळे वीज उत्पादनावर कुठलाही विपरीत परिणाम झाला नसल्याचे महानिर्मितीच्या सूत्रांकडून कळते.