शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:06 IST

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : राजुरा येथे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेविषयी मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत क्षेत्र मर्यादेची अट शिथिल केली. जवळपास सर्व शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात एकून ७ हजार २०० कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची ही योजना असून सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी नुकतीच वरोरा येथे बैठक घेऊन सर्व महसूल अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिलेत. विभागीय आयुक्तांना या संदर्भात कालबद्ध उद्दिष्टपूर्ती अपेक्षित आहे. अपलोड करण्यात आलेल्या नावांचा दररोज आढावा घेतला जात असून प्रमुख अधिकाऱ्यांकडे तालुक्यांची पाहणी करणे आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सांगितले.जिल्ह्यामध्ये १५ तालुक्यात यासंदर्भात मोहीम राबविण्यात येत आहे. अपात्रतेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्येदेखील शेतकºयांची नोंद केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, जे करदाता असतील, शासकीय सेवा ,पदाधिकारी, निवृत्तीवेतन धारक, पती-पत्नीच्या दोघांचे नाव असेल, माहिती देण्यास त्यांनी नकार दिला असेल अथवा आपसी वादामध्ये जमीन असेल अशा सर्वांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.वनहक्क पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्या सर्वांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी आपल्या नावाची नोंद करावी. शेतकऱ्यांसाठी आता हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे ज्या खातेदाराच्या नावाने जमीन आहे. त्यांनी आपली नोंद करणे आवश्यक आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.