शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीचे जुने बसस्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: May 23, 2016 00:57 IST

गोंडपिंपरी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात प्रवाशांना विसावा घेण्यासाठी बसस्थानक निवाऱ्याची निर्मिती करण्यात आली.

प्रवाशांची गैरसोय : नगरपंचायतीचे दुर्लक्षगोंडपिंपरी : गोंडपिंपरी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात प्रवाशांना विसावा घेण्यासाठी बसस्थानक निवाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र फळ विक्रेत्यांनी अगदी बसस्थानकासमोरच आपली फळांची दुकाने थाटत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात प्रवेश करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असून बसस्थानकासमोर लावण्यात येणारे फळांचे दुकान त्वरित हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गोंडपिंपरी शहराच्या राज्य महामार्गावर जुने बसस्थानक आहे. याच परिसरात मुख्य बाजारपेठ आहे. जुन्या बसस्थानकासमोर व आजुबाजुला मागील अनेक वर्षांपासून फळ विक्रेत्यांनी आपली फळांची दुकाने थाटून चक्क जुन्या बसस्थानक प्रवासी निवाऱ्याला अतिक्रमणाच्या विळख्यात टाकले आहे. नगरपंचायतीची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामपंचायतीला वेळोवेळी पत्रव्यवहार करून फळांची दुकाने हटविण्यासाठी विनंती करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने, याकडे दुर्लक्ष केले होते. स्थानिक शहरातून जाणाऱ्या राज्य मार्ग अरुंद असून फळ विक्रेत्यांसह इतरही दुकानदारांनी रस्त्याच्या काठापर्यंत शेड थाटून आपल्या मालाची मांडणी करू लागले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंग करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना विसावा घेण्यासाठी बांधण्यात आलेला प्रवासी निवारा प्रवाशांसाठीच विसावा घेण्यासाठी असावा, अशी अपेक्षा आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात जुन्या बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता नगरपंचायत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचेलक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)आठवडी बाजाराची जागा अपुुरीगोंडपिंपरीचा आठवडी बाजार रविवारी भरतो. आठवडी बाजारासाठी जागा अपूर्ण पडत असल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर दुकाने लावतात. परिणामी वर्दळीचे ठिकाण असलेल्या जुन्या बसस्थानक परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आठवडी बाजारासाठी योग्य जागेची निवड करावी, अशी मागणी होत आहे.