शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई न करता परस्पर ‘बकऱ्यावर’ समझोता

By admin | Updated: August 30, 2015 00:44 IST

जिल्ह्यात अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे धाडसत्र सुरू असले तरी जिवती तालुक्यात मात्र अवैध धंद्याच्या बाबतीत स्थानिक पोलिसांची भूमिका विरोधाभासाची आहे.

संघरक्षित तावाडे जिवतीजिल्ह्यात अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे धाडसत्र सुरू असले तरी जिवती तालुक्यात मात्र अवैध धंद्याच्या बाबतीत स्थानिक पोलिसांची भूमिका विरोधाभासाची आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांची भूमिकाही अवैध धंदेवाल्यांच्या जोडीदाराची आहे, अशी तालुक्यातील जनतेची ओरड आहे. ही ओरड सार्थ ठरणारी घटनाही येथे उघडकीस आली. कारवाई न करता ‘बकरा’ घेऊन आरोपीसोबत समझोता करणाऱ्या या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.तालुक्यातून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या भोलापठार येथे पोलिसांनी एका व्यक्तीकडे गांजा पकडला. परंतु त्याच्यावर कारवाई न करता पोलिसांनी ‘सेटलमेंट’ ची भूमिका निभावली म्हणे. कारवाईच्या बदल्यात दहा हजार रुपये आणि घरचा एक बकरा पोलिसांनी घेतल्याची माहिती गावकऱ्यांच्याच चर्चेवरून मिळाली. तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर जिवती तालुका असून या सीमेवरुन दारुच नाही तर गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. पण यावर आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणा मजबुत नाही की तशी त्यांची इच्छाच नाही, हेच कळेणासे झाले आहे.सीमेलगत असलेल्या गावात तेलंगणा राज्याची दारु मोठ्या प्रमाणात विकली जाते. पण कुणीच पकडला जात नाही. सीमेवरील रस्त्यांवर पोलीस असतातही. पण होत काहीच नाही. उलट ‘सेटलमेंट’ होतानाही लोकांनी पाहिले असल्याची चर्चा आहे. जे कोणी सदर प्रकार घडत असताना पाहतात, त्यांच्यावर दबाब येत असतो, असेही बोलले जात आहे. त्यात भोलापठार अपवाद नाही. या ठिकाणी एका व्यक्तीकडे पोलिसांनी गांजा पकडला, दहा हजार रुपये घेतले. एवढ्यावर हे पोलीस थांबले नाहीत तर त्याच्या घरी बांधून असलेला बकराही पोलिसांनी नेला. पण कुणालाही याचा थांगपत्ता लागला नाही. कायद्याचे रक्षक जर भक्षकाची भूमिका निभावत असतील तर सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी बकऱ्यावर केलेला समझौत्याची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात सुरू आहे, हे विशेष.