शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलस्वराज्य प्रकल्पातून शुद्ध पाणी मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:28 IST

जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.

ठळक मुद्देसत्या पल्लागणी : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून कामांची तांत्रिक पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.गुरूवारी जलस्वराज्य- दोनमधील सरू असलेल्या कामांची तांत्रिक पाहणी करताना ते वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना येथे बोलत होते.यावेळी एकाजुर्नाचे सरपंच राजू रणदिवे, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष लक्ष्मण चिंचोळकर, ग्रामसेवक चाफले, कुचनाचे सरपंच ठाकरे, ग्रामसेवक मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यकारी अभियंता संजय वाघ, शाखा अभियंता बाराहाते, भालाधरे, स्नेहा रॉय, प्रवीण खंडारे, कुणाल शितोळे, अंजली डाहुले, प्रगती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना व भद्रावती तालुक्यातील कुचना, काटवल भगत व बेलोरा येथील कामांची तांत्रिक पाहणी केल्यानंतर सत्या पल्लागणी यांनी अनेक सूचना केल्या. प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्र लांडगे, शाखा अभियंता साळवी यांनी प्रकल्पाच्या वाटचालीची माहिती दिली.पल्लागणी म्हणाले, मार्च २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण होऊन गावातील प्रत्येक घरात मीटरद्वारे पाणी पोहचले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. यामध्ये तांत्रिक त्रुट्या राहु नये याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सात योजनांकरीता ४१ कोटी रूपये खर्च केला जात आहे. पाणी गुणवत्तेसाठी ३३ गावांवर सहा कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेवर जागतिक बँक लक्ष ठेवून आहे. काही योजना नवीन संकल्पनेद्वारे तयार केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना चोवीस तास पाणी मिळणार आहे. ही योजना योग्यरित्या सुरू राहावी, यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घ्यावे, असेही सत्या पल्लागणी यांनी सांगितले.यावेळी प्रकल्प संचालक देवेंद्र लांडगे म्हणाले, आजही अनेक गावे या प्रकल्पात समाविष्ट होण्याकरिता प्रतीक्षा करीत आहेत. या योजनेचा पाणीकर कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतला मिळाला पाहिजे तरच लाभ होऊ शकेल. पाणी गुणवत्ता गावांतील सर्व वॉटर एटीएमची पाहणीही केली.