शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पर्यटकांना खुणावणारा ‘भिमलकुंड’ उपेक्षितच

By admin | Updated: November 10, 2014 22:40 IST

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा भिमलकुंड नावाचा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी

जयंत जेनेकर - वनसडीमाणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा भिमलकुंड नावाचा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरत आहे. निसर्गरम्य सफारीची अनुभूती त्यांना येथून मिळत असते. मात्र भिमलकुंड धबधबा सध्या उपेक्षित असून याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी जाण्यासाठी कुठलाही पक्का रस्ता नाही. डोंगररांगातील हिरव्याकंच वनराईतून पायदळ वारी करत स्थळ गाठावे लागते. डोंगरदऱ्यामुळे येथे एखादा व्यक्ती रस्ता सोडून भटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करीत आहे. सभोवताल हिरवे रान, त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून खोल दरीत कोसळणारा धबधबा विलोभनीय दिसतो. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भुरळ घालतो. येथील रानफूल सुगंधाची मुक्त हस्ताने उधळण करीत असतात. निसर्गाच्या या शॉवरखाली आंघोळ करण्याची मजा वेगळीच! त्यामुळे अनेकजण या धबधब्याला भेट देतात. सुमारे १५० फुट उंच कडावरुन कोसळणाऱ्या पाण्यामुळे खाली जमिनीवर कुंड तयार झाला.या कुंडाला ‘भिमलकुंड’ म्हणून संबोधले जाते. या कुडांचे रुप हे भीमासारखे भासत असल्यानेच याचे नाव भिमलकुंड पडले असावे. मात्र येथील कडा उतरणे व चढणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या धबधब्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे आवश्यक आहे. येथे जाण्यासाठी मुख्य अडचण रस्त्याची असल्याने महिला, लहान मुले व वयोवृध्दांना या ठिकाणी सहज येता येत नाही. या डोंगरावर विविध वनऔषधी वनस्पती असल्याचे दिसून येते. येथील रस्त्याच्या कडेला आवळ्यांच्या रांगा आहे. या धबधब्यालगतच्या परिसरात नागाची खोरी, रोहिणी मुंडा, जांभुळधराची झिरणे आदी मनाला मोहित करणारी पर्यटनस्थळेही आहेत. परंतु विकास नसल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे ठिकाण विकसित होऊ शकले नाही. या स्थळाचा पर्यटन विकास व्हावा, अशी निसर्गप्रेमींची अपेक्षा आहे.