शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो मजुरांना ‘आधार’ची सक्ती

By admin | Updated: April 10, 2015 00:51 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. रोहयोच्या कामावर राबणाऱ्या मजुरांची मजुरी यापुढे केवळ राष्ट्रीयकृत बँकेत जमा होणार असून जिल्हा मध्यवर्ती बँक तथा स्थानिक पोस्ट कार्यालयातील खाते यापुढे चालणार नाही, असा आदेश शासनाने काढला आहे. त्यामुळे मजुरांना आता नव्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामाचा समावेश होतो. या योजनेत १२० दिवस कामे उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन दिलेच पाहिजे, असा कायदा आहे. आदिवासी बहुल गावात १५० दिवस कामे दिली पाहिजे, असेही शासनाचे धोरण आहे. मात्र १ एप्रिलपासून या मजुरांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याने आधार कार्ड नसेल तर मस्टर तयार होणार नाही, याची धास्ती मजुरांनी घेतली आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेर्तंगत प्रत्येक नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ८४ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र, जे २६ टक्के नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत, ते नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामावर असणारे बहुतेक मजुर आहेत. तर आधार कार्ड काढुनही अनेकांना पोस्टाद्वारे आधार कार्ड प्राप्त झालेले नाही. त्यामुळे रोहयोच्या कामावर आधार कार्ड विना जायचे कसे, हा पेच मजुरांसमोर निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाची मजूरी मजुरांच्या खात्यात जमा होते. हे खाते राष्ट्रीयकृत बँकेतच असणे गरजेचे आहे. मात्र अनेक गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा अनेक गावात सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे बँकेचे व्यवहार पार पडत आहेत. मात्र रोजगार हमी योजनेच्या कामावर राबणाऱ्या मजुरांना मजुरीसाठी राष्ट्रीयकृत बँकेची अट घालण्यात आल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली आहे. पोस्ट आॅफिसच्या शाखेतील खातेही आता यापुढे चालणार नाही, असा आदेश शासनाने काढला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)