शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धान्यातील तुटीने रेशन दुकानदार व ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:33 IST

शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदार धान्याची उचल करीत असतात उचल केलेल्या धान्यातील वजनात मोठी तुट येत असल्याने ही तुट कशी भरून काढावी, यावरुन स्वस्त धान्य दुकानदारासह रेशन उचलणारे ग्राहक त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देआर्थिक भुर्दंड : धान्याची उचल करताना येते तूट

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदार धान्याची उचल करीत असतात उचल केलेल्या धान्यातील वजनात मोठी तुट येत असल्याने ही तुट कशी भरून काढावी, यावरुन स्वस्त धान्य दुकानदारासह रेशन उचलणारे ग्राहक त्रस्त झाले आहे.गरिबांना कमी दरात धान्य उपलब्ध व्हावे, याकरिता स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवरुन नागरिक गहू, तांदुळ, साखर आदी गृहोपयोगी वस्तूंची दर महिन्याला उचल करीत असतात. स्वस्त धान्य दुकानदार शासनाकडून मिळणाऱ्या कमिशनवर ग्राहकांना धान्य देत असतात.मागील काही महिन्यांपासून शासकीय गोदामातील ५० किलोच्या बॅगमध्ये एक ते दीड किलो धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना कमी मिळत आहे. कधी ही तूट ५० किलो बॅगमध्ये दोन किलोपर्यंत जात असते. गहू व तांदळामध्ये अशा प्रकारची तूट मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.काही स्वस्त धान्य दुकानदार शासकीय गोदामातून ३०० ते ४०० क्विंटल गहू व तांदळाची महिन्याकाठी उचल करीत असतात. या मोठ्या स्वस्त धान्य दुकानदारांना त्याचा अधिक फटका बसत आहे. स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वजनाने धान्य मोजून दिले जाते. त्यामुळे त्यांचे इलेक्ट्रॉनिक काट्यांना वजनाकडे लक्ष असते. वजन कमी दिल्यास ग्राहक ओरड करीत असतात. अशावेळी शासकीय गोदामातून उचल केलेल्या तूट असलेल्या धान्याचा भुर्दंड स्वस्त धान्य दुकानदारांना सहन करावा लागत आहे. ते नुकसान कोणीही भरून देत नाही.शासनाकडून मिळणाºया कमिशनमध्ये स्वस्व धान्य दुकानदारांना दुकान त्यातील नोकरवर्ग इतरही खर्च करावा लागतो. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार मेटाकुटीस आल्याचे दिसून येत आहे. यासोबत एखाद्या वेळी धान्याचा दर्जा सुमार असल्यास ग्राहक ते घेत नाही. तोदेखील भुर्दंड स्वस्त धान्य दुकानदारास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.