शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात आढळला दुर्मिळ खवल्या मांजर

By admin | Updated: July 14, 2014 01:48 IST

शहरातील पदमालया नगरात राहणाऱ्या विजय पेंदरे

वरोरा : शहरातील पदमालया नगरात राहणाऱ्या विजय पेंदरे यांच्या घरी काल शनिवारी रात्री अतिशय महत्वाचे व दुर्मिळ असलेले खवल्या मांजर आढळले. सर्पमित्र अविनाश मांदाडे यांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. हे दुर्मिळ खवल्या मांजर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.वरोरा शहरातील पदमालयानगरात राहत असलेले विजय पंदरे यांच्या घरी काल रात्री १२ वाजताच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. पंदरे यांनी पहिल्यांदा हा प्राणी पाहिल्याने त्यांचे कुटुंब भयभित झाले होते. त्यांनी तात्काळ सर्पमित्र अविनाश मांदाडे यांना पाचारण केले. मांदाडे यांनी त्याला ताब्यात घेऊन हा दुर्मिळ खवल्या मांजर आहे, यापासून मानवाला कोणताही धोका किंवा नुकसान नाही, असे सांगितले. दुर्मिळ खवल्या मांजराला ‘इंडियन पॉगोलीन’ असे म्हणतात. हा प्राणी साधारणत: जंगलात आढळतो. त्याच्या अंगावर खवले असतात. त्याची लांबी अडीच ते तीन फुटापर्यंत असून तो मासाहारी आहे व तो सेड्यूल १ मध्ये मोडल्या जातो. त्याचे मुख्य खाद्य म्हणजे वाळवी, उधळ्या, मुंग्या व वारूळात राहणारे किटक आहे. सदर प्राण्याला दात नसून तो आपल्या नखांनी वारूळ पोखरून आपल्या जिभेच्या साहाय्याने भक्ष करतो. त्याचे नखे खुप मोठे असून ते बोथट असतात. त्याला धोका जाणवल्यास तो आपल्या शरिराला विशेष प्रकारची गोल गुंडाळी करतो व स्वत:चे रक्षण करतो. सर्पमित्र अविनाश मांदाडे यांनी त्याला पकडून मधुबन हॉटेलमध्ये एका पिंजऱ्यात ठेवले असता वरोरा शहरातील नागरिकांनी दुर्मिळ खवल्या मांजर पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून सदर प्राण्याची नोंद करून त्याला जंगलात सोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)