शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ताफा पोहोचला शाळेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:13 IST

नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित तालुक्यात आदर्श ठरलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी निघून गेला. तरी शिकवायला गुरुजी मिळाले नाही.

ठळक मुद्देशिक्षकांना नियुक्तीचे आदेश : कुंभेझरी शाळेला मिळाले गुरुजी

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित तालुक्यात आदर्श ठरलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी निघून गेला. तरी शिकवायला गुरुजी मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या पालक व गावकऱ्यांनी शाळेतील विध्यार्थ्यासह जिल्हा परिषद चंद्रपूरसमोर अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता व तसे निवेदनही संबंधित विभागाला देण्यात आले होते. परंतु अंदोलनापूर्वीच शिक्षण अधिकाऱ्यांचा ताफा शाळेत दाखल झाला. तीन शिक्षकांना तात्काळ नियुक्तीचे आदेश दिल्याने शाळेत गुरुजी येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सोमवारपर्यंत दोन विषय शिक्षक देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी देत पालकांची समजूत घातली.१ ते ७ वर्ग असलेल्या कुंभेझरीच्या शाळेत २१८ विध्यार्थी असून एकाच शिक्षकाला सात वर्गाचा भार सांभाळावा लागत होता.वारंवार शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला होता. दरम्यान, २५ जुलैला विध्यार्थ्यासह चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेसमोर अभिनव आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला होता. परंतु बुधवारी सकाळीच कुंभेझरीच्या शाळेत शिक्षण अधिकारी (प्राथ) जितेंद्र लोखंडे, उपशिक्षण अधिकारी (प्राथ.) किशोर काळे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे, पोलीस निरिक्षक नाईकवाडे, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेत भेट देत गुरुजी येण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.तत्काळ तीन शिक्षकांना नियक्तीचे आदेश दिले असून दोन विषय शिक्षक सोमवारपर्यंत पाठविण्याचे आश्वासन दिल्याने पालक व विद्यार्थ्यांच्या आशा वाढल्या आहेत.