शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

देवीच्या दर्शनासाठी रांगत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:10 IST

देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो.

ठळक मुद्देबल्लारपुरातून दर्शनवारी: १२ किमी प्रवासाला ३६ तासांचा कालावधी

अनेकश्वर मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो. याला धार्मिकतेची जोडही मिळाली आहे. भक्तीच्या ओढीने बल्लारपूर येथील भाविकांची सहा वर्षांपासूनची दर्शनवारी सुरू आहे. बल्लारपूर ते चंद्रपूरपर्यंत १२ किमी अंतर केवळ श्रद्धेमुळे रांगत-रांगत ३६ तासांत पूर्ण करून महाकालीच्या दर्शन घेतल्या जात आहे.राणी लक्ष्मी वॉर्डातील तारा बरमैय्या यांच्या कुटुंबीयांची देवी महाकालीच्या दर्शनवारीचे वास्तवातील चित्र आहे. देवी महाकालीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. कौटुंबीक परिस्थिती जेमतेम. मात्र सप्तमीला देवी महाकालीचे दर्शन घेण्याचा संकल्प भक्तीभाव उजागर करणारा आहे. १२ किलोमीटर अंतर रांगत प्रवास करून आदिशक्तीचा जागर धार्मिक भावना जोपासणारा आहे. किसन बरमय्या, आकाश बरमय्या, अविनाश गेडाम व गणेश तेलसे यांनी पंचमीला म्हणजे रविवारी रात्री ८ वाजता वाघाचे रूप धारण करून घरून देवी महाकालीच्या दर्शनासाठी वारी सुरू केली आहे.महाकाली आराध्य दैवत आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान आदीशक्तीचा जागर केला जातो. संकल्पसिद्धी केली जाते.मंगलमय वातावरण असते. सामान्य नागरिकांना राक्षसी प्रवत्तीपासून वाचविणारी त्राता म्हणून देवीचे रूप आहे. तिचे सशक्त रूप भाविकांना ओढ लावते. यामुळेच ओढीने देवी महाकालीच्या दर्शनासाठी वाघाचे रूप धारण करून रांगत प्रवास करतो, अशी माहिती किसन बरमैय्या यांनी ‘लोकमत’ला दिली. आमची देवीवर श्रद्धा आहे. भक्तीभाव जोपासतो. दैवी शक्तीचे वरदान लाभावे हीच मनिषा बाळगून सप्तमीला दर्शन घेतो, असेही त्यांनी सांगितले.मूर्ती घडविण्यातूनच जागा झाला भक्तीभावआकाश बरमय्या हे विविध देवीदेवता व गणेश मूर्ती घडवितात. मूर्ती घडविण्याच्या निमित्ताने भक्तीभाव जागृत झाला. साक्षात्कार झाल्याने वाघाचे उग्ररूप धारण करून देवीपुढे नतमस्तक होण्यासाठी दर्शनवारी केल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी ६ वाजता विसापूर टोल नाक्यावरुन महाकालीच्या दर्शनासाठी रांगतरांगत वारी सुरु केली. चार जण देवीची रांगत दर्शनवारी करतात तर कुटुंबातील अन्य सदस्य सोबतीला आहेत. पंचमीला सुरू झालेला भाविकांचा हा प्रवास सप्तमीला महाकालीच्या दर्शनाने पूर्ण होणार आहे. भाविकांच्या अंगी सत्वगुणांचा संचार व्हावा. मनोकामना पूर्ण व्हावी, हाच या प्रवासामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.