शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रामपूरवासीयांना मिळाले पाणी

By admin | Updated: June 2, 2017 00:41 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायततंर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे पाण्याची भीषण टंचाई होती.

पायपीट थांबली : इंजिनच्या साह्याने पाण्याचा पुरवठानिळकंठ नैताम । लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायततंर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे पाण्याची भीषण टंचाई होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, प्रशासनाने दखल घेत शेतातील एक कि.मी. अंतरावरील विहिरीचे पाणी रामपूर दीक्षित येथील कोरड्या विहिरीत सोडले. त्यामुळे या विहिरीमध्ये ५ फुट पाणी जमा झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक व महिलांना दिलासा मिळाला आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित गावात भिषण पाणी टंचाई होती. येथील महिला गावालगत असलेल्या एका शेतातील खड्यातील पाण्यावर आपली तहान भागवत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. सदर वृत्ताने प्रशासनात खळबळ उडाली. त्यामुळे जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पोंभुर्णा येथील पाणी टंचाई संबंधीत आढावा बैठक घेतली. व अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.त्यानंतर स्थानिक अधिकारी व पं.स. पोंभुर्णाचे संवर्ग विकास अधिकारी शशीकांत शिंदे व उपसंवर्ग विकास अधिकारी डॉ. उत्कर्ष वाघरे यांनी देवाडा खुर्द येथील सरपंच विलास मोगरकार व ग्रामािवकास अधिकारी दंडारे यांच्या सहकार्याने येथील पाणी विषयक समस्या सोडविण्यासाठी गावाशेजारील विहिरीचे पाणी गावातील विहिरीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर किसन सातरे यांचे शेतातील विहिरीतील पाणी साफ करण्यात आले. मात्र सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावांपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या भाऊजी घोंगडे यांचे शेतातील विहिरीतील पाणी साफ करून रामपूर दीक्षित येथे नळयोजनेच्या पाईपला विहिरीतील इंजनचे कनेक्शन जोडले. मात्र पाईल लिकेज असल्यामुळे ते पाणी गावामध्ये पोहचू शकले नाही. त्यानंतर इंजिनद्वारे साठ ते सत्तर पाईप जोडून थेट रामपूर दीक्षित येथील कोरड्या विहिरीमध्ये पाणी सोडले. त्यामुळे या विहिरीमध्ये आता ५ फुटाचे वर पाणी जमा आहे. गावामध्ये आता पाणी उपलब्ध झाल्याने येथील महिला वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.एप्रिलमध्ये विहिरी कोरड्यारामपूर दीक्षित येथे दोन हातपंप व एक विहिर आहे. यातील एक हातपंप अनेक महिन्यांपासूनच बंद आहे. तर दुसरे हातपंपातून पाहिजे तसे पाणी मिळत नाही. तर येथील विहिर मार्च-एप्रिल महिन्यातच कोरडी पडत असते. त्यामुळे या गावातील महिला गावालगत असलेल्या दामोधर घोंगडे यांच्या शेतातील खड्ड्यातील पाण्यावर आपली तहान भागवत असतात. ही समस्या या गावात अनेक वर्षांपासून आहे. भारत निर्माण योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावीदेवाडा खुर्द येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. गावात पाणी टंचाई असताना आठ वर्षांपासून ही योजना कार्यान्वित नाही. मात्र या योजनेसाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले. तो निधी व्यर्थ गेला काय, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाची वरिष्ठांकडून चौकशी करावी. यातील दोषी असलेले अध्यक्ष व कंत्राटदार तसेच इतर सदस्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.