शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून रामाळा तलाव स्वच्छता अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST

चंद्रपूर : इको-प्रो तर्फे रामाळा तलाव संवर्धनासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन संपताच सोमवारपासून श्रमदान करून रामाळा स्वच्छता अभियान सुरू करण्यात ...

चंद्रपूर : इको-प्रो तर्फे रामाळा तलाव संवर्धनासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन संपताच सोमवारपासून श्रमदान करून रामाळा स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी तलावाची पार असलेल्या किल्ल्याच्या भिंतीचे झाडी-झुडपे काढून तसेच गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन व छटपूजादरम्यानचे माठ व जलपात्र संकलन करण्यात आले.

रामाळा तलाव संवर्धनाच्या आंदोलनासोबतच तलाव स्वच्छतासंदर्भात लोकसहभागातून स्वच्छता अभियान सुरू केले आहे. सकाळी सहा ते नऊ या वेळेत इको-प्रोचे सदस्य एकत्रित येत नियमित स्वच्छता करणार आहेत. यात प्रामुख्याने किल्लाच्या भिंतीतून निघालेली वृक्षवेली, झाडे-झुडपे काढण्यात येणार आहेत.

सोमवारी इको-प्रोच्या सदस्यांनी विसर्जन पाॅइंटच्या दोन्ही बाजू, किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली झुडपे काढली. यापूर्वी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनीसुध्दा काही झाडे काढली आहेत. रविवारी काही विद्यार्थ्यांनी तलावकाठावरील प्लॅस्टिक कचरा जमा करून स्वच्छता केली. स्वच्छता अभियानात सहभागी होणाचे आवाहन इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी केले आहे.

बाॅक्स

प्रशासनाकडून त्वरित काम सुरू होणे गरजेचे

या उन्हाळ्याचा काळातील ९० दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, तलाव कोरडा होणे आणि खोलीकरणास हा वेळ पुरेसा नाही. यात या दिवसाचे योग्य नियोजन करून काम पूर्णत्वास जाईल याकरिता प्रशासनाकडूनसुध्दा लवकरात लवकर कामाची सुरुवात होणे गरजेचे आहे.

बाॅक्स

फोटो

माठांचा पक्षी जलपात्र तसेच वृक्षारोपणासाठी वापर

इको-प्रोने रामाळा तलाव स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. दरम्यान, तलावाच्या काठावर जमा झालेली गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन तसेच छटपूजादरम्यानचे मोठ्या प्रमाणात माठ, जलपात्र एकत्र करण्यात आले आहे. ्त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यांचा वृक्षारोपणासाठी तसेच पक्ष्यांसाठी जलपात्र म्हणून वापर करण्यात येणार आहे.