शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका आल्या की राम आठवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:10 IST

निवडणुका आल्या की भाजपाला राम आठवतो. रामाच्या नावावर खोटं बोलण्याचा धडाका भाजपा नेत्यांनी लावला आहे. जे रामाचे होऊ शकले नाही, ते जनतेचे काय होणार, असे प्रतिपादन विधीमंडळ उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जनसंघर्ष यात्रेला जनतेचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर/ ब्रह्मपुरी: निवडणुका आल्या की भाजपाला राम आठवतो. रामाच्या नावावर खोटं बोलण्याचा धडाका भाजपा नेत्यांनी लावला आहे. जे रामाचे होऊ शकले नाही, ते जनतेचे काय होणार, असे प्रतिपादन विधीमंडळ उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्टÑात चार महिन्यांपासून महाराष्ट्राच्या हक्कासाठी व जनतेच्या हितासाठी निघालेली संघर्ष यात्रा शनिवारी रात्री ९ वाजता चंद्रपुरातील कोहीनूर क्रीडांगणात दाखल झाली. त्यानंतर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आ. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. विजय वडेट्टीवार, आमदार आशिष देशमुख, विदर्भ निरीक्षक आशिष दुवा, अतुल लोंढे, जिल्हा प्रभारी किशोर गजभिये, शकुन नागानी, विशाल मुत्तेमवार, स्वयंजोक रामकिशोर ओझा, अनुसूचित जातीचे प्रदेश अध्यक्ष राजु वाघमारे, सेवक वाघाये, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, सुभाषसिंह गौर, श्याम उमाळकर, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, विनायक बांगडे, घनश्याम मुलचंदानी, माजी आमदार देवराव भांडेकर, प्रकाश पाटील मारकवार, चित्रा डांगे, सुर्यकांत खनके, हरिष कोत्तावार, अ‍ॅड. मलक शाकीर, फारूख सिद्धीकी, विनोद संकट, शालिनी भगत, डॉ. रजनी हजारे, नंदा अल्लूरवार, वंदना भगत, अश्विनी खोब्रागडे, सुनिता अग्रवाल, शिवा राव, अनिल शिंदे, मंचावर उपस्थित होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, अतुल लोंढ यांचीही भाषणे झाली.दरम्यान, रविवारी ही यात्रा ब्रह्मपुरी येथे पोहचली. याठिकाणीही जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना अपमानजनक वागणूक व उल्लेख केल्याबद्दल विद्यार्थ्यामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. अश्या शिक्षणमंत्रांनी जवाबदारीचे वक्तव्य करणे गरजेचे होते. त्यांना सत्तेचा माज आला आहे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले.तत्पूर्वी ब्रह्मपुरी शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.