शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीतून पर्यावरण संवर्धनावर जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:04 IST

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गसंवर्धन व पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याकरिता चंद्रपूर वनवृत्ताच्या वतीने मंगळवारी शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महानगर पालिकेचे पदाधिकारी, शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देजागतिक पर्यावरण दिन : चंद्रपूर वनवृत्ताचे आयोजन, विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गसंवर्धन व पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याकरिता चंद्रपूर वनवृत्ताच्या वतीने मंगळवारी शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महानगर पालिकेचे पदाधिकारी, शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.महानगर पालिकेपासून पथनाट्याद्वारे रॅलीला सुरुवात झाली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकूम त्रिवेदी, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीमध्ये वनविभाग,वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, एसटीपीएफचे कर्मचारी व वनवविकास महामंडळाचे अधिकारी, पोलिस विभाग व इको - प्रो संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी वाघ ,बिबट, अस्वल वन्यप्राण्यांचे मुखवटे परिधान करून पर्यावरण व वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करा, असा संदेश शहरातील नागरिकांना दिला. महानगर पालिका, पटांगणातून निघालेली रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जटपुरा गेट येथून रामबाग वन वसाहत परिसरात पोहोचली. या परिसरात पोंभुर्णा येथील बहुउद्देशीय संस्थेच्या पथकाद्वारे जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.उमेश्वर आत्राम यांच्या मार्गदर्शनात पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कलापथकाद्वारे पर्यावरण संवर्धनाच्या विविध पैलुंवर जनजागृती केली. याप्रसंगी महापौर घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व अन्य मान्यवर उपस्थित होते. हिरे यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. निरोगी पर्यावरणाशिवाय माणूस जगू शकत नाही. महापौर घोटेकर यांनीही जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. वन विभागाने सुरू केलेल्या उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वन विभागात प्रेरणादायी कार्य करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.