लोकमत न्यूज नेटवर्कविरूर (स्टे) : रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज बहीण भावाचा पवित्र सण, श्रावणात इतर सणांच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन.राखी पोर्णिमेची उत्सुकता प्रत्येक भावाबहिणीत असते, अगदी आता-आतापर्यंत रक्षाबंधनासाठी सगळी भावंडे एकत्र जमत असतात. शिक्षणासाठी किंवा अन्य कारणांसाठी दूर गावी असलेला भाऊ या काळात घरी येवून राखीचा सण साजरा करतात. लग्न झालेल्या बहिणीच्या घरी यानिमित्ताने जावून भाऊ राखी बांधतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सणाला भावा-बहिणीची भेट होत असते. माऊलीचे ममत्व यावेळी तिच्या डोळ्यात तळत असते, त्यामुळे बहीण भावाच्या या सणाला फार महत्त्व आहे.आता मात्र परिस्थिती बरीच बदललेली आहे. अजा नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने भाऊ बहीण अंतराने अधिक दूर गेले आहेत, तर काही परदेशात आहेत. त्यामुळे कितीही ओढ असली तरीही फक्त या सणापुरते येवून राखी बांधणे शक्य नसते. त्यासाठी कुरिअरने राखी पाठविली जात आहे. बाजारातही वेगवेगळ्या किंमतीच्या आणि पॅटर्नच्या राख्या विक्रीला असून चांदीच्या राख्या घेण्याकडे कल वाढला आहे. आता तर राखीवर नेते, राजकीय पुढारी, अन्ना हजारेही दिसायला लागले आहे.दूरदेशी असलेल्या भावाला इंटरनेटमुळे आॅनलाईन राखी आता पाठवता येऊ शकते, अशाप्रकारे राखी पाठविण्याकडे अनेक जण उत्सुक आहेत. हा भाऊ बहिणींना आधार मिळाला आहे. राखी पाठविली असली तरी ओवाळणी करता येणार नाही. ही रुखरुख दोघांच्याही मनात असते. बदलत्या परिस्थितीत एकमेकांच्या वेळेचा अंदाज घेवून वॅबकॅमवर भेटून आता ओवाळणी होते. ज्येष्ठ नागरिक भावाबहिणीसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो. तेही रक्षाबंधन साजरा करीत असतात. लहान मुलांसाठी हा सण खूपच आनंदायी असतो, वर्षे न वर्षे वय असलेल्या भावाच्या हातावर गोंद्याची राखी बांधतांना बहिणीला आणि बहिण जर लहान असेल तर भावाला राखी बांधून घेताना खूप अप्रूप वाटते. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळा उत्साह असतो. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी राखीचा सण हा वेगळा नसतोच, अशा लोकांची सतत भ्रमंती सुरू असते. घर ही संकल्पना त्यांच्यासाठी दुयम असते, दूरवर असलेले देशाला संरक्षण देणारे सैनिकांना मात्र कधी कधी रक्षाबंधनाला घरी येऊ शकत नाही. त्यांना फार मोठा खेद वाटतो. बंदीस्त असलेल्या कैदांनाही काही महिला राखी बांधतात, त्यामुळे रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे.
राखी पौर्णिमा बंध रेशमाचे, वचन रक्षणाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:01 IST
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज बहीण भावाचा पवित्र सण, श्रावणात इतर सणांच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. राखी पोर्णिमेची उत्सुकता प्रत्येक भावाबहिणीत असते, अगदी आता-आतापर्यंत रक्षाबंधनासाठी सगळी भावंडे एकत्र जमत असतात.
राखी पौर्णिमा बंध रेशमाचे, वचन रक्षणाचे!
ठळक मुद्देरक्षाबंधन : दूरदेशी भावासाठी इंटरनेटवरूनही पाठविली जाते राखी