सीसीटीव्ही कॅमेरा कुचकामी : वॉटर कुलर बंद, कार्यालय परिसरात दारूचा बाटल्याबी.यू. बोर्डेवार - राजुराराजुरा पंचायत समिती कार्यालयाने अस्वच्छतेचा कळस गाठला असून संवर्ग विकास अधिकारी कार्यालयाच्या परिसरात फेरफटका मारला असता घाणीने माखलेल्या भिंती व सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. राजुरा पंचायत समिती परिसरातील हातपंप चोरीला गेला असून या भागात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. तर कार्यालयात लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा अनेक दिवसांपासून बंद पडला आहे. कार्यालयातील डिस्प्ले बोर्डची तुटफुट झाली असून कृषीविषय सल्यासाठी असलेले कॉल सेंटर १५५१ बंद पडले आहे. येथील स्वच्छतागृहात तर दुर्गंधीमुळे उभे राहणेही शक्य होत नाही. पाणी जाण्यासाठी पाईप नाही. त्यामुळे पूर्ण पाईपलाईन चोकअप झाली आहे. कार्यालयाच्या परिसरात अनेक ठिकाणी दारूच्या बाटला फेकलेल्या दिसून आल्या. कृषी विभागाच्या बाजुच्या कार्यालय स्लॅबला भेगा पडल्या आहे. बुधवारी दुपारी १.३० वाजता कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालयात खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. तर अनेक विभागात खुर्च्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही ठिकाणी टेबलवर खुर्च्या ठेवल्या होत्या. ग्रामपंचायतींना स्वच्छतेचे धडे देणारे पंचायत समिती कार्यालय स्वत:च अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहीमेला संवर्ग विकास अधिकाऱ्यांची केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते. जे कार्यालय स्वत:चा परिसर नीटनेटके ठेऊ शकत नाही, ते कार्यालय एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे धडे काय देणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
राजुरा पंचायत समितीने गाठला अस्वच्छतेचा कळस
By admin | Updated: January 21, 2016 01:05 IST