शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा व चंद्रपूरचे आमदार ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

स्थानिक लोकांच्या मागणीवरून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांसह पैनगंगा परियोजना प्रकल्पात धडक दिली व तेथील अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. प्रकल्पात पोहोचल्यानंतर सुरुवातीला पूर्ण पैनगंगा प्रकल्पातील जुन्या व नवीन खाणीची पाहणी केली.   तिथे कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांची भेट घेतली.

ठळक मुद्देस्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी पैनगंगा प्रकल्पात आमदारांची धडक

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पात ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचा नियम आहे; मात्र विरुर (गाडेगाव) येथील पैनगंगा प्रकल्पात केवळ ५ ते १० टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आला असून, ९० टक्के परप्रांतीय कामगारांचा भरणा करण्यात आला आहे.स्थानिक लोकांच्या मागणीवरून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांसह पैनगंगा परियोजना प्रकल्पात धडक दिली व तेथील अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. प्रकल्पात पोहोचल्यानंतर सुरुवातीला पूर्ण पैनगंगा प्रकल्पातील जुन्या व नवीन खाणीची पाहणी केली.   तिथे कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांची भेट घेतली. तिथे काम करणाऱ्या कामगारांची यादी मागितली. दोन्ही आमदारांनी यादी तपासल्यानंतर त्याठिकाणी स्थानिकांपेक्षा परप्रांतीय कामगारांची संख्या जास्त दिसल्याने आमदारांनी तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच झडती घेतली.महालक्ष्मी, गोलछा व इतर ट्रान्सपोर्ट कंपन्यांना जोपर्यंत परप्रांतीय कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

वाहनांची तपासणी करापैनगंगा परियोजना प्रकल्पात वापरात येणारे ट्रक बाहेर राज्यातून आले असून, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचनाही दोन्ही आमदारांनी तहसीलदार व ठाणेदार यांना दिल्या आहेत. पैनगंगामध्ये काम मागण्यासाठी  स्थानिक प्रकल्पग्रस्त गेले असता, आशिष मासिरकर नावाच्या येथे काम करणाऱ्या युवकाने गुंड पोसले असल्याच्या तक्रारी अनेक कामगारांनी आमदारांसमोर केल्या, ते शस्त्रसुद्धा वापरत असल्याच्या तक्रारी आहेत.

 कामगारांचे व्हेरीफिकेशन शेकडो परप्रांतीय कामगार या ठिकाणी काम करीत असून, एकाही कामगारांची पोलीस स्टेशनमधून पडताळणी करण्यात आलेली नाही. ही गंभीर बाब उघड झाली. जोपर्यंत परप्रांतीय कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना दोन्ही आमदारांनी पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.