शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा परिसर प्रदुषणाच्या विळख्यात

By admin | Updated: July 24, 2016 01:02 IST

औद्योगिक परिसर : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राजुरा : राजुरा तालुक्यामध्ये ज्या गतीने औद्योगिकरण झाले त्याच गतीने प्रदुषणामध्येसुद्धा वाढ झााली आहे. राजुरा परिसरात सीमेंट उद्योग, कोळसा उद्योगामुळे राजुरा तालुक्याचे नावलौकीक झाले. मात्र राजुरा परिसरातील लोकांना प्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे. राजुरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड अंतर्गत कोळसा खाणीमुळे सास्तीसह परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. कोळशाच्या धुराचे कण परिसरात पसरुन अनेक नागरिकांना त्रास होत आहे. या खाणीमुळे परिसरात उष्णतेमध्येसुद्धा मोठी वाढ झाली आहे. गुप्ता कोल वॉशरीज, आयर्न, कोल वॉशरिजच्या आजूबाजुच्या परिसरातील शेतकरी जल प्रदूषणामुळे त्रस्त झााले. या ठिकाणी कोळसा स्वच्छ धुवून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ताो कोळसा थर्मल पॉवर स्टेशनला पाठविला जातो. त्यामुळे विजेच्या उत्पादनातसुद्धा वाढ होत असते. हा कोळसा स्वच्छ करण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा मोठा वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. परिसरातील जनता शांत आहे. जलाचा साठा कमी तर होतच आहे सोबत प्रदूषणामुळे शेतीवर, पिकांवर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. चुनाळा येथील गुप्ता मेटल्स अ‍ॅन्ड पॉवर लिमिटेड या कंपनीच्या धुरामुळे चुनाळा, बामनवाडा, राजुरा परिसरातील जनता हैराण झाली आहे. चुनाळा येथे तर काळाकुट्ट धुराचा थर सकाळी गाडीवर, घरांच्या टेबलावर दिसतो. बामनवाडा येथेसुद्धा या प्रदूषणामुळे येथील बालकांवर परिणाम झालेला आहे. या भागात कारखाने आले. पाण्याचा उपसा सुरू झाला. उच्च प्रतिचे लाईमस्टोन भूगर्भातून काढल्या जात आहे. परंतु या भागातील बेरोजगारांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कारखानदार वापरत आहे. यापेक्षा लाजीरवाणी बाब कुठली आहे. या भागातून ओव्हरलोडचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा, सीमेंट वाहतूक होत असून रस्त्यावर कोळसा पडत असल्यामुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. या परिसरात नैसर्गिक साधनसामग्रीचा झपाट्यांनी वापर होत असताना प्रदूषणाकरिता योग्य उपाययोजना पुरेपूर होत नसल्याचे चित्र आहे. या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून वेळीच दखल न घेतल्यास याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)