शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राजुरा नगरपालिकेने टाकला दुप्पट करवाढीचा बॉम्ब

By admin | Updated: November 15, 2015 00:43 IST

राजुरा नगरपालिकेने करवाढ करताना मालमत्ता कराची दुप्पट करवाढ केल्यामुळे राजुरा शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

राजुरा : राजुरा नगरपालिकेने करवाढ करताना मालमत्ता कराची दुप्पट करवाढ केल्यामुळे राजुरा शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ही नियमबाह्य करवाढ असून नागरिकांना लुटण्याचा नगर पालिकेचा डाव आम्ही उधळून लावू, असा इशारा विरोधी पक्षनेता प्रा. अनिल ठाकूरवार यांनी दिला आहे.नगर पालिकेच्या ठरावानुसार जुन्या मालमत्तेवर १० टक्के करवाढ करावी आणि नवीन बांधकाम असेल तर त्याचे मुल्यांकन करावे, असे असताना जुन्या मालमत्तेवरसुद्धा दुप्पट, अडीच पट करवाढ केल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.नगरपालिकेने केलेल्या कारवाईवर नगर पालिका प्रशासनाच्या व सत्ताधारी अध्यक्षाच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे भरमसाठ कर वाढ करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार नगरपालिका करीत असल्याचा आरोप प्रा. अनिल ठाकुरवार यांनी केला आहे. सर्वेक्षणाच्या काळात गंभीर चुका आहे. नगर पालिका व्यवस्थापन आणि मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने करवाढीचा बडगा सामान्य नागरिकांवर पडत असल्याचा आरोप प्रा. अनिल ठाकुरवार यांनी केला आहे.दरम्यान, राजुरा शहरातील नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोझा पडत असेल तर आम्ही कदापी सहन करणार नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे सतीश धोटे यांनी आपल्या पत्रकातून म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)