शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

‘रेन वॉटर हार्वेस्टिग’ थंडबस्त्यात

By admin | Updated: June 5, 2017 00:22 IST

उन्हाळा लागला की चंद्रपुरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावते. येथील तप्त उन्हाळ्यामुळे दरवर्षीच ही समस्या उद्भवते.

पावसाळा तोंडावर : अनेक इमारतींवर यंत्रणाच बसविली नाहीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळा लागला की चंद्रपुरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावते. येथील तप्त उन्हाळ्यामुळे दरवर्षीच ही समस्या उद्भवते. यावर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने मागील वर्षी चंद्रपूरकरांना त्यांच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्यास बाध्य करण्याचा निर्णय घेतला होता. मनपाच्या या निर्णयाचे विविध सामाजिक संघटनांनीही स्वागत केले होते. मात्र मागील वर्षी बोटावर मोजण्याइतक्या लोकांनीच आपल्या इमारतीवर ही यंत्रणा बसविली होती. पावसाळा आता सुरू होत आहे. मात्र यंदाही ही कामे कुठे सुरू असल्याचे दिसत नाही.चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा राज्यभर प्रसिध्द आहे; नव्हे तर कुप्रसिध्द आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तर सूर्य अक्षरश: आग ओकत असतो. तप्त उन्हामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प एप्रिल महिन्यातच अखेरची घटका मोजयला लागतात. दोन-चार प्रकल्प ड्राय झालेले असतात. नदी-नाल्यांमध्येही पाणी नसते. असा अनुभव जिल्हावासीयांना दरवर्षीच येतो. या सर्व प्रकारामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावते. हातपंप, विहिरी आटून अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होते. काही ठिकाणी तर ही पाणी टंचाई एवढी भिषण असते की नागरिकांना अनेक अंतर पायपीट करून पाणी आणावे लागते.दरम्यान, चंद्रपुरात पाणी टंचाई जाणवू नये, पावसाळ्याचे पाणी जमिनीत मुरुन उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली जाऊ नये, यासाठी महानगरपालिकेने मागील वर्षी यावर काहीअंशी तोडगा काढण्याच्या विचारातून एक संकल्पना पुढे आणली. पावसाळ्यातील पाणी उगाच व्यर्थ जाऊ नये म्हणून चंद्रपुरात घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. चंद्रपुरात असलेल्या १७५०० मालमत्ताधारकांची यादी मनपाने तयार केली. या मालमत्ताधारकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यास बाध्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच जे नवीन बांधकाम आहे, त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली नसेल तर बांधकाम परवानगी रद्द करण्याचेही ठरविण्यात आले. तत्कालिन आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या काळात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. यावेळी काही नगरसेवक व मनपाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीनंतर संपूर्ण कामाचे चॉकआऊट करण्यात आले. मालमत्ताधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली नसेल तर त्यांना नोटीस बजावण्यात येणार होती. विशेष म्हणजे, ज्या मालमत्ताधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली, त्यांना करामध्ये दोन टक्के सुट देण्यात येणार होती. या कामासाठी सहा कंत्राटदारही नियुक्त करण्यात आले. पावसाळ्याला जुलै महिन्यात सुरुवात होईल म्हणून २० जूनपूर्वीच ही कामे पूर्ण करायची, असे ठरविण्यात आले होते. मात्र आयुक्तांच्या बदलीनंतर ही प्रक्रियाच मंदावली. मागील वर्षी चंद्रपुरात अपवादात्मक काही मालमत्ताधारक सोडले तर इतरत्र कुठेही ही सिस्टीम बसविल्याचे दिसून आले नाही. मागील वर्षीची चुक यंदा होणार नाही, असे अपेक्षित होते. मात्र यावेळीदेखील तीच री ओढली जात आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा लोटत आहे. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पुढे जुलै महिना पावसाचा महत्त्वाचा महिना समजाला जातो. मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा इमारतीवर बसविली जात असल्याचे कुठेही दिसून येत नाही. मनपालाही आपल्याच निर्णयाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पावसाळ्यातील पाणीही जमिनीत न मुरता व्यर्थ जाणार, हे निश्चित. या संदर्भात महानगरपालिकेचे बांधकाम अभियंता महेश बारई यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. नगरसेवकांनी पुढाकार घ्यावाचंद्रपूर महानगरपालिकेत ६६ नगरसेवक व पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरातील मालमत्तांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची व्यापक जनजागृती करणे आवश्यक होते. यासाठी गतवर्षी मनपातील नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आधी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी, त्यानंतर नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे ठरविण्यात आले होते. मात्र काही नगरसेवकांचा व पदाधिकाऱ्यांचा अपवाद सोडला तर बहुतांश नगरसेवकांनी मनपाच्या या निर्णयाला बगल दिली. मात्र चंद्रपूरसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याने निदान नगरसेवकांनी तर यासाठी पुढाकार घेत आपल्या इमारतींवर ही सिस्टीम बसविणे गरजेचे आहे.