शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाची झड

By admin | Updated: August 31, 2014 23:40 IST

जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : गणरायाच्या आगमनासह पावसाचेही पुनरागमनचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे. गणेश चतुर्थीपासून पावसाने पुन्हा पुनरागमन केले. यावेळी तो दमदार पडला. शनिवारी रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला. रविवारी दिवसभरच पावसाची झड कायम होती. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी पावसाबाबत चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जून, जुलै व आॅगस्ट या महिन्यातच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जणू घसाच कोरडा झाला. पिके संकटात सापडली. कसे होणार या विवंचनेत शेतकरी सापडला होता. याशिवाय जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. पावसाने यंदा प्रारंभापासूनच सर्वांचा जीव टांगणीला ठेवला. यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतरही पाऊस पडला नाही. जून महिन्यात केवळ सरासरी ६१.४२ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यातील पावसाची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत केवळ ३३ टक्के होती. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही. या महिन्यात ३०८.१७ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी टक्केवारी ७७ एवढी होती. आॅगस्ट महिना देखील पावसाचाच महिना आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३४३.१६ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात या महिन्यात केवळ ८५.७९ मिमी पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ २५ एवढी आहे. जिल्ह्यातील जिवती, कोरपना, राजुरा, चिमूर, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस पडला आहे. दरम्यान, गणरायाचे आगमन होताच पावसाचेही पुनरागमन झाले. गणेश चतुर्थीच्याच दिवशी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहिले. काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडतच राहिला. त्यानंतर आज रविवारी जोरदार पाऊस नसला तरी सकाळपासूनच पावसाची झड होती. दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ४३५.८० मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस गोंडपिपरी तालुक्यात पडला. या तालुक्यात ५९.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, नागभीड, राजुरा, जिवती तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला. (शहर प्रतिनिधी)