शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

‘एन्ट्री’ करून पाऊस गायब

By admin | Updated: June 26, 2016 00:37 IST

यावर्षी खरीप हंगाम आणि निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहत आहे. प्रारंभी मान्सून येईल, भरपूर पाऊस पडेल,

अस्मानी संकट : शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडेचंद्रपूर : यावर्षी खरीप हंगाम आणि निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहत आहे. प्रारंभी मान्सून येईल, भरपूर पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा दाखविण्यात आली. मात्र वेळ निघून गेल्यानंतरहही मान्सून आला नाही. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. आतातरी पाऊस नियमित येईल, अशी आशा वाटली. मात्र पाऊस एन्ट्री करून अचानक गायब झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तो कर्जबाजारी झाला. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी पूर्णत: खचून गेला होता. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र पैसेवारीत जिल्हा पात्र ठरला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मदत मिळाली नाही. मागील दोन वर्षांचे झालेले नुकसान विसरून बळीराजा पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला आहे. शेतातील अनावश्यक कचरा स्वच्छ करण्यात आला आहे. शेणखत टाकण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुंपणाचीही आतापासूनच व्यवस्था करून ठेवलीे आहे. नांगरणी-वखरणीची कामेही सुरू असून तीसुध्दा अंतिम टप्प्यात आहे. इकडे कृषी विभागानेही खरीप हंगामाचे नियोजन करून ठेवले आहे. यंदा कृषी विभागाने ४ लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कापूस १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन १ लाख १८ हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी कापसाने दगा दिल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंत दर्शविली होती. मात्र यावेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाची लागवड वाढणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमुंग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीत धान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.ऐनवेळी शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने खते मागविली आहेत. खताची एक खेप जिल्ह्यात उपलब्धही झाल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)एकूणच हंगामपूर्वीची सर्व कामे आता आटोपली आहेत. आता बळीराजा केवळ पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह दोन, चार तालुक्यात हा पाऊस तासभर बरसत राहिला. यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले. मात्र ते तात्पुरत्या स्वरुपात साचले होते. जमीन एवढी गरम होती की काही तासातच शेतातील पाणी सुकले. तरीही एकदाचा मान्सून आला; आता नियमित पावसाची रिपरिप सुरू राहील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटायला लागली. मात्र त्यानंतर पुढे पाऊस अचानक गायब झाला आणि कडाक्याचे ऊन्ह पडू लागले. या उन्हामुळे पुन्हा अनेक समस्या निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे लागल्या आहेत.