शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पावसाचे पाणी असेच गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:40 IST

शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टिम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाणार नाही, असाही धोरणात्मक पवित्रा मनपाने घेतला.

ठळक मुद्देरेनवॉटर हॉर्वेस्टिंग सिस्टिमचा अभाव : आपल्या निर्णयाचा मनपालाच विसर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टिम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाणार नाही, असाही धोरणात्मक पवित्रा मनपाने घेतला. मात्र त्यानंतर मनपाला आपल्या धोरणाचा विसर पडल्याचे दिसते. काही इमारतींचा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी ही सिस्टिम बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही पावसाचे पाणी जमिनीत न मुरता असे वाहून गेले.चंद्रपूर शहराला हॉट सिटी म्हणून संबोधले जाते. येथील उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात ४९ अंश सेल्सीयसपर्यंत चंद्रपूरचे तापमान पोहचते. विशेष म्हणजे, सगळीकडे उन्हाळा चार महिन्यांचा असला तरी चंद्रपुरात तो सहा महिन्यांचा असतो, असे आजवरचा अनुभव आहे. तीव्र उष्णतामानामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. त्यामुळे जलस्रोत आटून अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाचे पाणी जमिनीत मुरणे अत्यंत आवश्यक आहे. ही गरज बघता घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसणे गरजेचे आहे.दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेने शहर हद्दीतील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मनपाने एक परिपत्रक काढून जनतेला आवाहनही केले. विशेष म्हणजे, शहरात कोणत्याही नव्या इमारतीचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक केले. ही सिस्टीम नसली तर बांधकामाला मनपाकडून परवानगी देण्यात येणार नाही, असाही धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करताना मनपाने गंभीरता दाखविली नाही. परिणामी बोटावर मोजण्याइतक्या इमारतींमध्येही ही सिस्टीम बसविल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्याचे पाणीही जमिनीत न मुरता नाल्यांवाटे वाहून गेले आहे.नद्यांचे पात्रही झपाट्याने आटतेचंद्रपूर शहराला लागून इरई व झरपट या दोन नद्या आहेत. यातील झरपट नदीचे तर केव्हाच वाटोळे झाले आहे. पावसाळ्याचे दिवस सोडले तर या नदी पात्रात तुरळक पाणी असते. इरई नदीत बऱ्यापैकी पाणी असते. मात्र उन्हाळ्यात या नदीचे पात्रही तळ गाठते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी आणखी जलदगतीने खाली जाते.करात मिळणार होती सूटचंद्रपूर मनपा हद्दीत असलेल्या ज्या इमारतधारकांनी आपल्या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविली असेल, त्यांना मालमत्ता करामध्ये सूट देण्याचाही निर्णय तेव्हा मनपाने घेतला होता. असे केल्याने मालमत्ताधारक स्वयंस्फूर्तीने ही सिस्टीम बसवतील, असे मनपाला वाटले. मात्र तसे झाले नाही. मनपाने याबाबत अधिक तगादा लावला नाही. त्यामुळे बहुतांश इमारतधारक या सिस्टिमच्या भानगडीत पडले नाही.जनजागृतीचा अभावशहरातील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविणे हा महत्त्वाकांक्षी निर्णय होता. यात लोकसहभाग मिळविण्यासाठी मनपाकडून व्यापक जनजागृती व सततचा पाठपुरावा अपेक्षित होता. मात्र मनपा प्रशासन असे करण्यात अपयशी ठरले. खुद्द मनपा प्रशासनच याबाबत गंभीर नसल्याने चंद्रपूरकरांनीही ही बाब गंभीरतेने घेतली नाही.