शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पावसाची धुवाधार बॅटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर कडक ऊन निघाल्याने सलग १५ दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. त्यामुळे मान्सूनचे आगमन केव्हा होणार याकडे जिल्हावासींचे लक्ष लागले होते. अखेर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनने झोडपल्याने पावसाचा वेग यापुढेही कायम राहील, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : जिल्ह्यात एकाच दिवशी ३०६.४ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन आठवड्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी चंद्रपूरसह जिल्हाभरात धुवाधार पाऊस बरसला. चंद्रपुरात सकाळी १० वाजेपासूनच दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पर्जन्यमान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक ३६२ मि.मी. सावली तालुक्यात १८३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी ३०६.४ पाऊस पडला.  पेरणी केलेल्या व पेरणीपूर्व मशागतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर कडक ऊन निघाल्याने सलग १५ दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. त्यामुळे मान्सूनचे आगमन केव्हा होणार याकडे जिल्हावासींचे लक्ष लागले होते. अखेर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनने झोडपल्याने पावसाचा वेग यापुढेही कायम राहील, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. गतवर्षीच्या तुलनेत मान्सून पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करणाऱ्या वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती,  गोंडपिपरी तालुक्यांतील सोयाबीन व कापूस उत्पादक बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. अंकुर उगविल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी दोन आठवड्यांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत होते. गुरुवारी जोरदार बरसल्याने दिलासा मिळाला.

खोळंबलेल्या मशागतीला येणार वेग  ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यांत धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या पिकासाठी मुबलक पाऊस लागतो. शेतकऱ्यांनी नवीन धानाचे वाण खरेदी करून पऱ्हे भरली आहेत. मात्र, धान पिकाच्या दृष्टीने पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीपूर्वीच्या मगाशतीची कामे थांबविली आहेत. पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास खोळंबलेल्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

भद्रावती तालुक्यात अत्यल्प पाऊसजिल्ह्यात १ ते ३० जून २०२१ पर्यंत भद्रावती तालुक्यात सर्वांत कमी १८०.१ मि.मी., तर सर्वाधिक ३६२ मि.मी. पाऊस बल्लारपूर तालुक्यात पडल्याची नोंद आहे. मान्सूनच्या आगमनापासूनच बल्लारपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण  अधिक असल्याची माहिती पर्जन्यमान विभागाने दिली. भद्रावतीनंतर सावली (१८३.५ मि.मी.) पोंभुर्णा तालुक्यातही पावसाचे प्रमाण अत्यल्प (१८३.५ मि.मी.) आहे. या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मशागतीची कामे पावसाची वाट पाहत आहेत. राजुरा तालुक्यातही गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस पडला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस