शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:39 IST

गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत चालूच होती. आधीच थंडी, त्यात दिवसभर पाऊस त्यामुळे चंद्रपूरसारख्या हॉट शहरातही आज काश्मीरला असल्याची जाणीव होत होती.

ठळक मुद्देथंडीचा जोर वाढला : अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत चालूच होती. आधीच थंडी, त्यात दिवसभर पाऊस त्यामुळे चंद्रपूरसारख्या हॉट शहरातही आज काश्मीरला असल्याची जाणीव होत होती.चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा बऱ्यापैकी तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. त्यामुळे पावसाळ्यात पाऊसही चांगलाच बरसेल, असा अंदाज होता. मात्र पावसाळ्यात पावसाने दगा दिला. प्रारंभी काही दिवस पाऊस पडल्यानंतर त्याने दडी मारली, ती कायमचीच. परतीच्या वेळीही पाऊस आला नाही. सध्या हिवाळा सुरू असल्याने थंडी पडणे आवश्यक आहे. मात्र असे न होता वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. मागील आठ दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सुर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व भागात पावसाला सुरूवात झाली. ही पावसाची रिपरिप रात्री ८ वाजेपर्यंत थांबली नाही. ऐन हिवाळ्यात पाऊस बरसत असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर निघाले. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील रस्ते सायंकाळच्या सुमारास ओस पडले होते. शासकीय कार्यालयांमध्येही शांतता दिसून येत होती. भरदुपारीच पारा १४ ते १६ अंशापर्यंत खाली पोहचला होता.रबी पिकांना फटकाया वातावरणाचा शेतपिकांवर मोठा परिणाम झाला असून कापसासह गहू, ज्वारी, हरभरा, तूर पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडींनी पिकांना ग्रासल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. खरिपातील पिकांनी शेतकºयांना दगा दिल्यानंतर रब्बी पिके शेतकऱ्यांना तारतील असे वाटत असतानाच अचानक वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरणाचा अनिष्ट परिणाम पिकांवर होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. परंतु यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघत नाही. आता रबीचेही उत्पादन घटण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचा संघर्ष व्यर्थशेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतात. हाडाची माती करून जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात कष्ट करतात. परंतु त्यांच्या नशिबी अजूनही संघर्षच आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. आता निसर्गही असा ऋतू सोडून वागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.