शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:42 IST

जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती, कोरपना, सिंदेवाही तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. चिमूर तालुक्यातील पाचगाव येथे दोन जण जखमी झाले तर एका घराचेही नुकसान झाले. या अकाली पावसाचा रबी पिकांना पुन्हा जोरदार फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती, कोरपना, सिंदेवाही तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. चिमूर तालुक्यातील पाचगाव येथे दोन जण जखमी झाले तर एका घराचेही नुकसान झाले. या अकाली पावसाचा रबी पिकांना पुन्हा जोरदार फटका बसला.मागील दोन-तीन दिवसांपासून थंडी जाऊन जिल्ह्याचे तापमान बºयापैकी वाढले होते. दुपारी ऊन्ह झोंबू लागली होती. अशातच शुक्रवारी सकाळपासून तापमान वाढले होते. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती, कोरपना, सिंदेवाही तालुक्यातील अनेक भागात वादळी वाºयासह पाऊस बरसला. गारपीटही झाली. ब्रह्मपुरी शहरात बोरीएवढ्या गारा पडल्या. त्यानंतर चिमूर, नवरगाव, जिवती, गडचांदूर, गांगलवाडी, नागभीड तालुक्यातील पाहाणी आदी गावात जोरदार गारपीट झाली. शंकरपूरपासून जवळ असलेल्या साठगाव, जवरबोडी, चिचाळा, कोलारी खैरी, पाचगाव येथे मोठया प्रमाणात गारपीट झाली. कोलारी येथील उषा बालकृष्ण धांडे व चिचाळा येथील सुरज गुडधे हे गारपीटमध्ये सापडल्याने जखमी झाले. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पाचगाव येथील एका घराचेही नुकसान झाले.जवराबोडी येथील १२ घरांचे, कोलारी येथील १७ घरांचे तर साठगाव येथील ११ घरांचे व चिंचाळा येथीलही काही घरांची अंशत: पडझड झाली. शंकरपूर येथील नेहरू शाळेचे किचन शेड व काही घरांचे छप्पर उडाले. नागभीड तालुक्यातील पाहाणी येथील एका कार्यक्रमाच सभामंडपही कोसळला. दरम्यान, सायंकाळी ७ वाजतानंतर चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात पाऊस बरसला. मात्र गारपीट झाली नाही.