शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

रेडियोकॉलर लावलेला माळढोक बेपत्ता

By admin | Updated: August 6, 2015 23:58 IST

जगातील अत्यंत दुर्मीळ मानला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील ११ वर्षांपासून वास्तव्यास आहे.

पक्षीप्रेमी चिंतेत : वन विभागाकडून घेतला जात आहे शोध, दूर निघून गेल्याची शंकावरोरा : जगातील अत्यंत दुर्मीळ मानला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील ११ वर्षांपासून वास्तव्यास आहे. प्रगणनेमध्ये माळढोक पक्ष्यांची संख्या १० पर्यंत पोहचली आहे. माळढोक पक्षांचे ‘लोकेशन’ संवर्धन करणाऱ्या वनविभागाला मिळावे, त्यासाठी एका माळढोक नर पक्ष्याला डिसेंबर १४ मध्ये रेडिओकॉलर चिप डेहराडून येथील तज्ज्ञांनी लावली. चिप लावल्यानंतर तीन ते चार महिने या माळढोक पक्षाचे लोकेशन मिळत होते. मात्र मागील १५ महिन्यांपासून चिप लावलेल्या माळढोक पक्षाचे लोकेशन मिळणे बंद झाल्याने वनविभागास पक्षी मित्र चिंतेत सापडले आहे.शेतातील साप, विंचू, किटक अलगद वेचून माळढोक पक्षी खात असल्याने या पक्षाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. जगात अत्यंत दुर्मिळ समजले जाणारे माळढोक पक्षी महाराष्ट्रातील नानज परिसरात सध्या बोटावर मोजण्याइतके आहे. तर हेच माळढोक पक्षी अकरा वर्षांपूर्वी वरोरा परिसरातील वनोजा, मार्डा आदी गावाच्या शिवारात आढळून आहे. वरोरा परिसरात माळढोक पक्षाची अंडीही आढळून आली होती. वरोरा तालुक्यासोबतच माळढोक पक्षी भद्रावती तालुक्यातील भटाळी परिसरात मागील काही वर्षांपासून आढळून येत आहे. माळढोक पक्षाची संख्या याच परिसरात वाढत असल्याने त्या पक्षाच्या संवर्धनाकरिता वनविभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक उपाययोजना कार्यान्वित केल्या आहेत. पावसाळ्यापासून शेतातील पिके निघतपर्यंत माळढोक पक्षी वरोरा व भद्रावती परिसरात दिसत असतो. त्यानंतर तो दिसेनासा होवून पावसाळ्यामध्ये परत येतो. पिके निघाल्यानंतरही माळढोक पक्षाचे अस्तित्व वेळोवेळी दिसावे, याकरीता डेहराडून येथील संस्थेच्या तज्ज्ञांनी एका माळढोक नर पक्षाला डिसेंबर २०१४ मध्ये रेडीयोकॉलर चिप लावली. त्यानंतर तीन महिने लोकेशन मिळत होते. मात्र मागील पंधरा महिन्यांपासून चिप लावलेल्या माळढोक पक्षाचे लोकेशन बंद झाले आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या माळढोक पक्षाचा वनविभाग शोध घेत आहे. रेडिओकॉलर चिप लावलेल्या माळढोक पक्षाचा शोध मागील काही महिन्यांपासून परिसरातील ४० गावांत घेण्यात येत आहे. मॉनेटरिंग करणे सुरू आहे. परंतु सुगावा लागला नाही. चिप लावलेला माळढोक पक्षी कुठे तरी दूर निघून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)