शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राधा म्हणते, न बघितलेले स्वप्न ‘लोकमत’मुळे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:24 IST

जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मी मात्र कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला विद्यार्थी दशेतच हवाई सफर करता येईल. मात्र ‘लोकमत’मुळे मला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली. अवघ्या दीड तासात विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीत विमानतळ पाहून मी भारावले, असे मत हवाई सफर विजेती चिमूरची राधा अजय चौधरी हिने व्यक्त केले.

ठळक मुद्देलोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा : दिल्लीत उपराष्ट्रपतींची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मी मात्र कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला विद्यार्थी दशेतच हवाई सफर करता येईल. मात्र ‘लोकमत’मुळे मला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली. अवघ्या दीड तासात विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीत विमानतळ पाहून मी भारावले, असे मत हवाई सफर विजेती चिमूरची राधा अजय चौधरी हिने व्यक्त केले.‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत राधाने सहभाग घेतला आणि ती जिल्ह्यातून विजेती ठरली. नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करून परत आल्यानंतर ‘लोकमत’शी तिने संवाद साधला. नागपूर विभागातील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील सर्व विजेते मंगळवारला सकाळी ७ वाजता नागपूरहून दिल्लीसाठी विमान प्रवासाला निघाले.सर्वांचाच पहिला विमान प्रवास असल्यामुळे मोठा उत्साह होता. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची भेट झाली. येथे दोन्ही राज्यांतील विद्यार्थी एकत्र भेटले. त्यानंतर देशाची राजधानी दिल्ली भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी आदींनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवनदेखील पाहिले. शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झाली नाही. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला ‘लोकमत’ समुहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत उपराष्ट्रपती नायडू यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया राधाने व्यक्त केली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरला पोहोचले. विमानातील व्यवस्था उत्तम होती. पण भीती वाटत होती, असेही राधा म्हणाली. लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने तालुका प्रतिनिधी राजाकुमार चुनारकर यांनी राधाच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.लोकमतच्या उपक्रमाने राधाचे कुटुंबीयही भारावलेउपराष्ट्रपतींनी मोलाचे मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. राजकारणात नसले तरी संसद भवनात बसण्याचा योग आला. मी ‘लोकमत’ची खूप आभारी आहे, अशी राधा म्हणाली. ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे राधाला विमानात पहिल्यांदाच प्रवास करण्याची संधी मिळाली. ही घटना विसरता येत नाही, अशी भावना चौधरी कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.