शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

थंडीवर रबीची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:51 IST

शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते.

ठळक मुद्देसिंचनाअभावी लागवड क्षेत्रात घट : ऋतुचक्राचे असंतुलन कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते. यंदा पावसाअभावी खरिपात शेतकºयांना अतोनात नुकसान सोसावे लागले. नैराश्यात असलेल्या आता रबीचा आधार आहे. मात्र ग्रामीण स्रोतात पाणी नसल्याने सिंचनाचा अभाव आहे. शिवाय गतवर्षी हिवाळ्यातील थंडी किती दिवसात गायब झाली, हा अनुभव पाठिशी आहेच. त्यामुळे अनेकजण रबीचा हंगाम करावा की नाही, या विवंचनेत आहे. एकूणच थंडी चांगली पडली तर रबीचा हंगाम शेतकºयांना दिलासादायक ठरेल. अन्यथा पुन्हा नुकसान अटळ आहे.यावर्षी खरीप हंगामावर शेतकºयांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना प्रारंभी पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. ज्यांनी केली, त्यांची पिकेही शेवटच्या पाण्याअभावी करपली. त्यामुळे खरीप हंगामातीेल उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.खरीप हंगामात जवळजवळ सर्वच शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले. अनेकांचा उत्पादन खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. बँका, सावकार व नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज शेतकरी फेडू शकले नाही. कर्ज फेडले, तर वर्षभर खाणार काय, हा देखील प्रश्न गंभीर.खरीपात बसलेला आघात अनेक शेतकरी सहन करू शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी रबी हंगामात पेरणी करायची हिंमतच दाखवित नसल्याचे दिसून येत आहे. काहींनी आता रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले नुकसान थोडेतरी भरून निघेल, या आशेपोटी रबी हंगाम करायची तयारी सुरू केली आहे. डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसºयांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.कृषी विभागाचे दीड लाखांहून अधिक सरासरी रबी हंगामाचे नियोजन असते. मात्र मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात केवळ ९० हजार हेक्टरवरच रबी पिकांची लागवड झाली होती. पुढे उत्पादनातही घट आली होती. यावर्षी कृषी विभागाने एक लाख २० हजार हेक्टरवर रबीचे नियोजन केले आहे. यंदा पावसाळ्यात ३५ ते ४० टक्केच पाऊस झाला असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती आहे. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शेतकºयांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. रबी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू व हरभºयाची लागवड होती. या पिकांना पाणी अधिक हवे नसले तरी थंडी चांगली पाहिजे असते. पिकांच्या वाढीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक असते. मागील वर्षी हिवाळ्याच्या चार महिन्यांतील बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच थंडीचा जोर दिसला. थंडीची अशीच परिस्थिती यंदाही राहिली तर गहू, हरभरा पिकांची वाढ खुंटून रबीतही शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.जमिनीत पाणी मुरलेच नाहीयंदा पाऊसच अत्यल्प पडल्याने जमिनीतही पाणी मुरले नाही. नदी, तलाव, बोड्यात पाणी नाही. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांचीही स्थिती नाजुक आहे. त्यामुळे रबीत पिकांना पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम व अंमलनाला धरणातून शेतकºयांना पाणी देण्यात येते. मात्र मागील वर्षी धरणातूनही कराराप्रमाणे पाणी देण्यात आले नसल्याचा शेतकºयांचा आरोप होता. यंदा तसे होऊ नये, अशी अपेक्षा आहे.