शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस व संभाव्य परिस्थितीवर रबीचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:06 IST

जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागाने समन्वयाने रबी हंगामाचे नियोजन करावे, ...

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : कृषी अधिकाºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागाने समन्वयाने रबी हंगामाचे नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.कृषी, सिंचन, पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी चंद्रपूरच्या विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दीपक चव्हाण, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने आदीसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी यावर्षी झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये भाताच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. सोयाबिनचा पेरा कमी झाला असून कपासीचा पेरा वाढला आहे. तथापि, जिल्ह्यातील अनेक प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अत्यल्प असल्यामुळे रब्बीचे नियोजन करताना प्रकल्पनिहाय नियोजन कृषी विभागाने करावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले.आसोलामेंढा प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असून गरज पडल्यास गोसेखूर्द प्रकल्पातून पाणी मिळवता येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कृषी विभागाने आसोलामेंढा प्रकल्पाशेजारी १६ हजार हेक्टर जमिनीसाठी वेगळे नियोजन करावे. या ठिकाणी गहू आणि चना या रब्बी पिकाची लागवड करण्यासाठी कृषी व संबंधित विभागाने शेतकºयांशी संवाद साधावा, असे सांगितले. यावेळी बंदी घातलेल्या बियाण्यांची लागवड, कृषी मित्र, उन्नत शेती, बियाण्याची उपलब्धता, युरीयाची उपलब्धता या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. औषधी विक्री दुकानांमधून औषध विक्री करताना शेतकºयांना आवश्यक सल्ला आणि सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सर्व विभागामार्फत शेतकºयांसाठी सुरु असणाºया योजनांवर यावेळी चर्चा केली. बैठकीला नरेंद्र जिवतोडे, शेखर चौधरी, चंद्रकांत गुप्ते, विजय वानखेडे, डॉ.भगवान गायकवाड आदींची उपस्थिती होती.फवारणीसाठी काळजी घ्यानव्या पध्दतीच्या बियाण्यांमुळे कपासी व अन्य पिकांची उंची वाढली आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकºयांनी सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करावा. चेहरा व शरीरावर विषारी कीटकनाशकांचा प्रभाव होणार नाही, याची काळजी घ्यावी. विषारी औषध अंगावर सांडल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते तसेच फवारणी यंत्र वापरताना शरीरापासून दूर राहील याची काळजी घ्यावी. तसेच वाºयाचा प्रवाह बघून फवारणी करण्याची दिशा ठरवावी, असे आवाहन बैठकीद्वारे करण्यात आले.