शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या हमीभावाचा प्रश्न मुख्य सचिवांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात आले असून त्यांनी ती विकायलासुध्दा सुरुवात केली आहे. परंतु चंद्रपूर ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आंदोलनाला श्रमिक एल्गारचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात आले असून त्यांनी ती विकायलासुध्दा सुरुवात केली आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. म्हणून नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपली तूर केंद्र सरकारने दिलेल्या हमीभावापेक्षा १२०० ते १५०० रूपये कमी भावाने विकावी लागत आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात नाफेडचे खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते निलेश राठोड यांनी केली आहे. ही मागणी प्रशासनाने शासनापर्यंत योग्यरित्या मांडली नसून प्रशासन राठोड यांचे आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने दबावतंत्र वापरत आहे. या सर्व बाबींची कल्पना श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांना मोबाईलद्वारे दिली असता जैन यांनी या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर या प्रकरणाचा निपटारा करण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती अ‍ॅड. गोस्वामी यांनी दिली.श्रमिक एल्गारच्या संस्थापिका व अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी नुकतीच निलेश राठोड यांच्या उपोषण मंडपाला भेट देवून त्यांच्या आंदोलनाला आपल्या संघटनेचा पाठिंंबा दर्शविला. यावेळी त्या म्हणाल्या, मोदी सरकारने तुरीला पाच हजार ६७५ रूपये हमीभाव जाहीर केला असून राज्य सरकारने अद्यापही नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केलेले नसल्यामुळे शेतकºयांना आपली तूर अत्यंत कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागत आहे.पोलीस शिपाई हटवलानिलेश राठोड हे मागील १८ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहे. पोलीस प्रशासनाने मागील पाच दिवसांपासून तिथे तैनात असलेल्या पोलीस शिपायाला हटविले आहे. निलेश राठोड यांची वैद्यकीय तपासणीसुध्दा झालेली नाही. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या या भूमिकेवर शेतकºयांनी रोष व्यक्त केला आहे.