शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सव्वा लाखांवर चाचण्या निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

रविवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये भटारा ता. वरोरा येथील ६५ वर्षीय पुरूष, कोहपरा ता. राजुरा येथील ७५ वर्षीय महिला तसेच ब्रह्मपुरी येथील ३८ वर्षीय पुरूष व ७८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २७६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

ठळक मुद्दे६३ नवे पॉझिटिव्ह : चार कोरोना बाधितांचा मृत्यू

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४९ हजार ७८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख २६ हजार ७२० नमुने निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ६३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १९ हजार ७५५ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ७२९ झाली आहे. सध्या एक हजार ७२७ बाधितांवर उपचार सुरू आहे. रविवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये भटारा ता. वरोरा येथील ६५ वर्षीय पुरूष, कोहपरा ता. राजुरा येथील ७५ वर्षीय महिला तसेच ब्रह्मपुरी येथील ३८ वर्षीय पुरूष व ७८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २७६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.दरम्यान, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी  नागरिकांनी बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.१९ ते ४० वयोगटातील   ८६४६ बाधितजिल्ह्यात एकूण १९ हजार ७५५ बाधित आतापर्यंत आढळून आले आहेत. यातील सर्वाधित म्हणजे ८६४६ बाधित हे १९ ते ४० वर्ष वयोगटातील आहेत. यावरून तरुणांनाच कोरोनाची जास्त बाधा होत असल्याचे दिसून येते. याशिवाय ० ते ५ वयोगटातील ३१४,  ६ ते १८ वयोगटातील १६४२, ४१ ते ६० वयोगटातील ६८५६ व ६१ वर्षांवरील २२९७ बाधित आतापर्यंत आढळून आले आहेत. याचाच अर्थ अजूनही कोरोनाची बाधा तरुणांमध्येच अधिक होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या