हंसराज अहीर : भद्रावती येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारभद्रावती : गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता अशा गुणवंतांच्या योगदानाची आवश्यकता असल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय दृष्टीसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल अधिक प्रशस्त कशी होईल यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची सिद्धता बाळगावी तरच प्रगतीकडे झेप घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देणे शक्य होईल, असे उद्गार केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी काढले.द्वि-वर्ष विकासपर्वनिमित्त १७ जून २०१६ रोजी भद्रावती येथे आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास माजी मंत्री संजय देवतळे, जेष्ठ नेते बळवंतराव गुंडावार, अशोक हजारे, तुळशीराम श्रीरामे, रवी नागपुरे, विजय वानखेडे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, राहुल सराफ, ओम मांडवकर, पांढरे, गोपाल गोस्वाडे, नरेंद्र जीवतोडे, प्रशांत डाखरे, राजेश भलमे, अफझल भाई, विकास खटी यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही या गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या ५६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक, शिक्षक वृंद व शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती
By admin | Updated: June 22, 2016 01:21 IST