शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

गुणवंत हेच देशाचे आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:57 PM

क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.

ठळक मुद्देभालचंद्र चोपणे : अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.भाजपा चंद्रपूर महानगराच्या वतीने रविवारी स्थानिक माता कन्यका परमेश्वरी सभागृहात पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, चांदा पब्लिक स्कुलच्या अध्यक्ष स्मिता जीवतोडे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, जि.प. समाज कल्याण सभापती, ब्रिजभूषण पाझारे, उपस्थित होते.आ. नाना श्यामकुळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. यावेळी निवडक सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी डॉ. चोपणे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला छंद जोपासावा. स्वयंनिष्ठा ध्येयनिष्ठा, सत्यनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, अध्ययननिष्ठा व समाजनिष्ठेकडे दुर्लक्ष करू नये. प्रास्ताविक राहुल सराफ तर संचालन नासिर खान यांनी केले. आभार शितल कुळमेथे यांनी केले.देशासाठी समर्पित तरूणाईची गरज : हंसराज अहीरविद्यार्थी हेच उद्याच्या पिढीचे प्रणेते आहेत. युवकांनी रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार करता यावा यासाठी अनेक योजना सरकारने सुरू केल्या. आर्थिक प्रगती करून समाज व राष्ट्रसेवेसाठी समर्पित तरूणाईची आज खरी गरज आहे. त्यासाठी महापुरूषांपासून प्रेरणा घ्यावी, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.