शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

पाच दिवसांत चार हजार ८१९ क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

फोटो घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड कृउबासमध्ये धानाची आवक चांगलीच वाढली आहे. या बाजार समितीत गेल्या पाच दिवसात चार ...

फोटो

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड कृउबासमध्ये धानाची आवक चांगलीच वाढली आहे. या बाजार समितीत गेल्या पाच दिवसात चार हजार ८१९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

कृऊबासमध्येही धानाचे भाव वाढले आहेत. मागील आठवडयात धानाचा भाव २ हजार ४०० रूपयांपर्यंत पोहचला होता. आता या भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. उच्च प्रतीच्या धानाला २ हजार ३०० रूपयापर्यंत दर आहे. मात्र शेतकºयांचा धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कल असल्याचे दिसून आहे.

मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आल्याने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायटयांकडे धान विक्रीसाठी चांगलाच कल वाढला होता. बहुसंख्य शेतकºयांनी या सोसायटया आणि पणनमहासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी नागभीड तालुक्यात आठ आदिवासी सोसाटया व दोन पणन महासंघाच्या केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून बोनससह २ हजार ५५० रूपयांपर्यंत भाव मिळत असल्याने आणि बाजार समितीत २ हजार २०० रूपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकºयांनी कृउबासकडे जवळपास पाठ फिरवल्यासारखेच चित्र होते. मात्र यावर्षी परिस्थिती उलट आहे.

बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ डिसेंबरला १०५६.८१ क्विंटल , ७ डिसेंबरला १ हजार १९२ क्विंटल , ९ डिसेंबरला ५४० क्विंटल,१० डिसेंबरला ८०० क्विंटल आणि ११ डिसेंबरला १ हजार २३१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.