शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-काजीपेठ एक्स्प्रेस २० आॅक्टोंबरपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:38 IST

चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांची पुणे गाडीची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर पूर्ण झाली असून ही गाडी येत्या २० आॅक्टोंबरपासून सुरू होत आहे.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिवाळीची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांची पुणे गाडीची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर पूर्ण झाली असून ही गाडी येत्या २० आॅक्टोंबरपासून सुरू होत आहे. २१ आॅक्टोंबर रोजी दुपारी १.३० वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे गाडीविषयी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला असून ही जिल्हावासीयांसाठी दिवाळीची अनमोल भेट ठरली आहे.ना. हंसराज अहीर यांनी पुणे-काजीपेठ क्र. २२१५१ व काजीपेठ-पुणे क्र. २२१५२ ही साप्ताहिक एक्सप्रेस दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता झाली आहे. गेल्या कित्येक जनतेने बघितलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकारले आहे. चंद्रपूर येथून पुण्याकरिता थेट रेल्वे गाडी नसल्याने या जिल्हयातील व्यवसायी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी व नागरिकांना प्रचंड असुविधा होत होती. गेल्या काही वर्षांपासून पुणे गाडी सुरू करण्याचा आग्रह रेल्वे सुविधा संघटनांच्या माध्यमातून ना. हंसराज अहीर यांच्याकडे धरण्यात येत होता. विद्यार्थ्यांकडून ही मागणी वारंवार केली जात होती. ना. हंसराज अहीर यांनी चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्हयातील लोकांच्या अडचणींची दखल घेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करून अखेर ही गाडी सुरू करवून घेतली. या नव्या साप्ताहिक पुणे गाडीमुळे जिल्हयामध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.२२१५१ क्रमांकाची पुणे-काजीपेठ एक्सप्रेस शुक्रवारी ९.४५ वाजता पुण्याहून सुटणार असून ही गाडी पुढील रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. ज्यात दांैड (११ वाजता), अहमदनगर, कोपरगांव (शिर्डी), मनमाड, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेरा (१०.२२), धामनगाव, पुलगांव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर (१.३७), बल्लारशाह (२.२५), शिरपूर, कागजनगर, रामागुंडम, पेदापल्लीनंतर काजीपेठला शनिवारी ६.३५ वाजता पोहचेल. २२१५२ क्रमांकाची काजीपेठ-पुणे एक्सप्रेस काजीपेठ येथून रविवारी १.३५ वाजता सुटेल. बल्लारशाहला ५.२५, चंद्रपूरला ५.५७, बडनेराला ९.५५, दौंडला ९.३०, पुणेला सोमवारी ११.०५ वाजता पोहचेल. पुणे-काजीपेठ या नव्या साप्ताहिक गाडीमुळे गोरगरीब प्रवाशांबरोबरच जिल्हयातील नोकरदार व पुण्यात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची फार मोठी सोय झाली आहे.